गर्वाने ज्ञानाचा स्तुतीने बुद्धीचा तर स्वार्थ ने प्रतिष्ठेचा नाश होतो*
*गर्वाने ज्ञानाचा स्तुतीने बुद्धीचा तर स्वार्थ ने प्रतिष्ठेचा नाश होतो*
तसं पाहिलं तर जीवन हे क्षणभंगुर असत. अनिश्चितेचा खेळ असतो . काहीही निश्चित नसताना सुद्धा जीवनात प्रत्येक घटना घडामोड हि जीवनातील परिणामांना जबाबदार असते . त्या अनुषंगाने प्रत्येक बाब करताना वागताना आपण किती सजग आहेत सचेत आहेत त्यानुसार जीवनाच मुल्यमापन ठरत असतं . आणि याच दरम्यान काही सिद्धांत पालन केले तर मग जीवन हे ऐतिहासिक ठरत आणि सिद्धांत पालन केले नाही तर अनेक जीव जसे जन्म घेतात आणि निरोप घेतात तितकंच आपण निमित्त मात्र ठरतो .पण काही सिद्धांत पालन करणारे व्यक्ती महान विद्वान विभुती ठरतात. गर्वाने ज्ञानाचा , स्तुती ने बुद्धीचा ,तर स्वार्थाने प्रतिष्ठेचा नाश होतो .हे अगदी जीवनातील कटु रहस्य आहे. पण हेच मुख्य रहस्य खुप कमी लोकांना अवगत ज्ञात आहे हेच मुळात दुर्दैव.आपण जीवनात ज्ञान अर्जित केले तर आपल्याला त्या ज्ञानाचा गर्व नसाला पाहिजे, तसेच आपण उत्तम कार्य केले तर आपली कोणीही स्तुती कौतुक करावं याची मुळात अपेक्षा नसावी म्हणजेच कोणतही कार्य करत असताना निष्काम भावनेने कर्मयोग म्हणून साक्षीभावाने करावं आणि स्वार्थचा तर जीवनात लवलेशही नसला पाहिजे. तेव्हा तो व्यक्ति सर्वतम सत्पुरुष असतो . आणि हेच निस्वार्थी भावनेने असलेलं लोकपयोगी ज्ञान लोककल्याणासाठी उपयोगी ठरतं. वास्तविक ज्ञान किती आहे याला फार महत्त्व नसत . पण ज्ञानाचा गर्व अंहकार आहे कि नाही याला खूप महत्त्व आहे .ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाचा गर्व असेल तर ते ज्ञान असुनही त्याचा शुन्य उपयोगी आहे . म्हणून ज्ञानाला कधीच अंहकाराचा गर्वाचा वारा लागु देऊ नये .आणि लागला तर मग मात्र हेच ज्ञान नाशपावत निरूपयोगी ठरत . म्हणून खरा ज्ञानी तोच आहे जो आपल्या ज्ञानाला अंहकार गर्वाचा वारा लागुन आपल्या ज्ञानाचा नाश होऊ देत नाही. म्हणून आयुष्यात ज्ञान किती अर्जित केल मिळवलं या पेक्षा ते टिकवल कि नाश पावल याला खूप महत्त्व असतं.महणुन ज्ञानावर गर्व करून ज्ञानाचा नाश न होऊ देणं हेच जीवनातील सर्वतम ज्ञान आहे .ज्ञान असताना ज्ञान हे स्तुती मुक्त असलं पाहिजे .स्तुती हि दोधारी तलवार आहे ती पेलेलच असं कोणालाही खात्रीने सांगता येत नाही. पेलली तर कल्याण होईल आणि जर नाही पेलली तर मग मात्र आपलंच नुकसान होत आपली कोणीही स्तुती केली तर आपण त्या स्तुती ने हुराळुन जाता कामा नये .स्तुती निंदा सम भाव असली पाहिजे.महणजे आपल कोणी कौतुक केलं तर आपण नम्र पणे ते स्वीकारून साक्षीभावाने वागल पाहिजे .महणजे स्तुती ने उन्मत्त होऊन त्याचा प्रभाव आपल्या बुद्धीवर होऊन आपल्या बुद्धीचा नाश होणार नाही .याची काळजी दक्षता आपण घेतली पाहिजे . जीवनातील सगळ्यात महत्वाची गोष्ट हि प्रतिष्ठा असते . प्रतिष्ठा मिळवणं सोपं असतं टिकवणे खुप कठिण आहे. प्रतिष्ठा आणि स्वार्थ ह्या परस्पर विरोधी बाबी आहेत . प्रतिष्ठा टिकवायची असेल तर स्वार्थ हा आपल्या आजूबाजूला फिरकला पण नाही पाहिजे . आणि म्हणून जीवनात स्वार्थ नसेल तर प्रतिष्ठा टिकुन राहते. आणि स्वार्थ मोह उत्पन्न झाला कि मग मात्र तिथुनच प्रतिष्ठा लोप पावायला सुरुवात होते . म्हणजे प्रतिष्ठेचा नाश होतो . जीवन हे क्षणभंगुर असलं तरी अनेक बाबी आणि घटना घडामोडीने ते भरलेलं असतं अशा वेळी जीवनातील प्रत्येकाचा हेतु उद्देश हा वेगवेगळा असतो पण यामध्ये ज्ञान , बुद्धी, आणि प्रतिष्ठा ह्या प्रमुख बाबी खुप महत्वाच्या आणि जीवनातील परिणाम अचानक बदलणार्या आहेत . म्हणून ज्ञान मिळवा पण अंहकार शुन्य व्हा गर्व बाळगू नका , चांगलं काम करा पण प्रसिद्धी, स्तुती चा मोह बाळगु नका , आणि निस्वार्थी व्हा आणि प्रतिष्ठा कायम अबाधित ठेवा हेच जीवनातील महत्वाचे आणि उपयोगी ज्ञान आहे.