गुन्हेगारी

बस स्थानकाच्या भिंतीची अज्ञात इसमाकडून तोडफोड कारवाईची मागणी

 बस स्थानकाच्या भिंतीची अज्ञात इसमाकडून तोडफोड कारवाईची मागणी

 

 

बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर बस स्थानकाची भिंत अज्ञात इसमाने तोडली असुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने एस टी महामंडळाकडे करण्यात आली असुन महामंडळाच्या अधीकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेवुन घटनास्थळी भेट देवुन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत कायम गजबजलेले असलेल्या बेलापुर बस स्थानकाची मागील बाजुस भिंतीस बसवीलेली खिडकी काही दिवसापूर्वी कुणीतरी तोडली होती त्यावर काहीच कारवाई न झाल्यावर काल रात्री कुणीतरी खोडसाळपणे भिंतीलाच मोठे भगदाड पाडले आहे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही बाब घातली पत्रकार देविदास देसाई यांनी तातडीने आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या कानावर ही बाब घातली श्रीरामपुर बस स्थानकाचे आगार प्रमुख राकेश शिवदे हे तातडीने बेलापुर येथे आले त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा यांच्या समवेत संबधीत ठिकाणी भेट दिली त्या वेळी अज्ञात इसमाने ही भिंत तोडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या या वेळी बसं स्थानकाचे कार्यालय कित्येक दिवसापासून बंद असल्याचे पत्रकार देसाई यांनी निदर्शनास आणून दिले असता लगेच या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले तसेच तोडलेली भिंत तातडीने पुन्हा पूर्ववत केली जाईल या करीता ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असे अवाहनही शिवदे यांनी केले त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात महीलाकरीता स्वच्छता गृहाची मागणी असुन निधीची देखील तरतुद केलेली असताना आपल्याकडून मंजुरी मिळाली नसल्याची बाब उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आगार प्रमुख शिवदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता प्रस्ताव पाठविलेला आहे मंजुरी मिळताच आपणास कळवीण्यात येईल असेही शिवदे यांनी सांगितले या वेळी स्थानक प्रमुख वसंत लटपटे प्रवासी मित्र प्रतिक बोरावके सुरक्षा रक्षक प्रकाश मुठे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड विलास कुऱ्हे आदि उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे