बेलापुर मराठी मुलींच्या शाळेकरीता गँलेक्सी लँबोरेटरीज कंपनीकडून एक लाख रुपयाच्या वस्तू भेट

बेलापुर मराठी मुलींच्या शाळेकरीता गँलेक्सी लँबोरेटरीज कंपनीकडून एक लाख रुपयाच्या वस्तू भेट
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील जिल्हा परीषद मराठी मुलींच्या शाळेला गँलेक्सी लँबोरेटरीज प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या सहकार्याने तीन एलईडी संच व एक कलर प्रिंटर असा सुमारे एक लाख रुपये किमतीच्या वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या गँलेक्सी लँबोरेटरीज प्रायव्हेट लिमीटेड नेवासा यांच्या वतीने सीएसआर फंडातुन मिशन आपुलकी अंतर्गत बेलापुर येथील मराठी मुलींच्या शाळेला सुमारे एक लाख रुपये किमतीच्या तीन एलईडी संच व एक कलर प्रिंटर भेट देण्यात आला या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गँलेक्सी लँबोरेटरी प्राईव्हेट लिमिटेड यां कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत देशमुख यांना धन्यवाद दिले असुन आपल्या व्यवसायातून मिळविलेल्या नफ्याचा काही भाग आपण समाज कार्यासाठी खर्च करता या बद्दल धन्यवाद व्यक्त केले या वेळी पत्रकार देविदास देसाई कंपनीचे मँनेंजर अनिल भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी शाळा व्यवस्थापन समीतीचा अध्यक्ष अजीज शेख सुर्यकांत हुडे मुख्याध्यापक लता बनसोडे विजया दहीवाळ शितल गायकवाड लता परदेशी राजेंद्र पंडीत देविदास कल्हापुरे हर्षदा पुजारी सुनिता सोर तरन्नुम खान राजाबाई कांबळे प्रदीप दळवी सौ उज्वला कुताळ शालेय व्यवस्थापन समीतीच्या उपाध्यक्षा सरीता मोकाशी आनिल मोकाशी आदीसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेखा सोनवणे यांनी केले तर अजीज शेख यांनी आभार मानले