हिंदुराष्ट्र सेना आणि दलीत महासंघाने सागर बेग यांना केला जाहीर पाठींबा.
हिंदुराष्ट्र सेना आणि दलीत महासंघाने सागर बेग यांना केला जाहीर पाठींबा.
धनंजय भाई देसाई यांच्या हिंदुराष्ट्र सेना आणि संजय चांदणे जिल्हाध्यक्ष असलेल्या दलीत महासंघाने जाहीर पाठींबा देत मोठ्याप्रमाणात मतदान मिळवून देण्यासाठी आवाहन केले.. हे धर्मकार्य समजून कार्यकर्ते पाठवण्याचाही शब्द दिला.
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- आजपर्यंत हिंदू धर्मीय मतदारांना रस्ता,महागाई या प्रश्नांमध्ये गुंतवून आणि हिंदूंना जातीजातीत विभागून सेक्युलर हिंदू विरोधी काँग्रेसने राजकारणाच्या आडून भारताचे चालवलेले इस्लामीकरण थोपविण्यासाठी आणि या गलिच्छ राजकारणाचे हिंदुकरन करण्यासाठी आमची लढाई असल्याचे स्पष्ट आणि परखड मत अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी गोंधवणी,गोंडेगाव, नायगाव आणि नाऊर याठिकाणी झालेल्या भरगच्च प्रचार सभेत मांडले.*
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचाराचा झंझावात दौरा काल मतदारसंघाच्या उत्तरेकडील उपेक्षित गावांमध्ये होता त्याप्रसंगी ते उपस्थित जनसमुदाया समोर बोलत होते.प्रत्येक गावात मिळत असलेला प्रतिसाद,पाठींबा आणि सभांना वाढत असलेली गर्दी बघता विजय निश्चित असल्याचा विश्वास गावागावातून मतदार बोलतांना दिसत आहेत.याप्रसंगी ते पुढे म्हणाले की,मी तुमच्याकडे मत मागायला नाही तर तुमच्यातील हिंदुत्व जागवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे निवडणूक हा त्यातलाच एक भाग आहे.जे काम संघटनेच्या माध्यमातून होण्यास अडचणी येतात तेच काम विधानसभा सदस्य होऊन विनाविलंब होईल म्हणून मी अपक्ष उमेदवारी भरली आहे. हिंदू आजपर्यंत खूप गाफील राहिलेला आहे आणि त्याचाच फायदा अधर्मी घेत आलेले आहेत ते थांबणे आज गरजेचे आहे.आपल्या मुलींना दिवसा ढवळ्या शाळा महाविद्यालयातून उचलेले जाते त्या अभागी मुलींच्या पाल्यांची फिर्याद देखील स्वीकारली जात नाही अशा कैक मुली आजही बेपत्ता आहेत तर काहींना वेश्या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आहे.हे हिंदू विरोधी कट कारस्थान अनेक वर्षापासून शांतपणे चालू आहे.त्यावर कोणीही आवाज उठवून त्या मुलींना न्याय दिलेला नाही.
श्रीरामपूरातील अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीला शाळेतून उचलून नेले तिचे धर्मांतर करून तिच्यावर अनेक जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी अत्याचार केले परंतु तिच्या पाल्याची फिर्याद सुद्धा पोलीस ठाण्यात घेण्यात आली नाही पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंदवून आरोपी मुल्ला कटर याला गजाआड केला असता तर सोळाव्या वर्षीच त्या अभागी मुलीवर अवेळी मातृत्व लादलं गेलं नसत.या महाराष्ट्र हादरून सोडणाऱ्या प्रकरणात स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष सुद्धा दिले नाही कारण आरोपी मुसलमान आहेत.पोलीस कारवाई करत नाही म्हणून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विधानसभेत आवाज उठवण्यात आला व त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली परंतु कारवाईस हलगर्जी पणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना घरचा रस्ता दाखण्यासाठी स्थानिक नाही तर दुसऱ्या आमदारांची मदत घ्यावी लागते हे श्रीरामपूरसाठी खूप मोठे दुर्दैव्य आहे.आणि स्थानिक आमदार त्याला प्रेम प्रकरण म्हणत हलक्यात घेतो अशांना आज हलक्यात घायची हीच वेळ असल्याचे आवाहन यावेळी सागर बेग यांनी केले.
याप्रसंगी बापूसाहेब शिंदे यांचेही मार्गदर्शन पर भाषण झाले.नाऊर येथे झालेल्या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक गणपत देसाई हे होते सभेचे नियोजन प्रशांत राशीनकर,गणेश राशीनकर,मनोज गहिरे,यांनी केले तर पंचक्रोशीतील असंख्य मतदार यावेळी उपस्थित होते.
गोंडेगावच्या सभेत बापू शिंदे यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता अपक्ष हिंदू हितासाठी लढणाऱ्या बेग यांना पाच हजार रुपयांची निवडणूक मदत दिली ती रक्कम बेग यांनी गावातून थोड्याच दिवसात जाणाऱ्या दिंडीच्या वारकऱ्यांना दिल्याने बेग यांच्या या मोठेपणाची झलक गावकऱ्यांना खूप भावली.
धनंजय भाई देसाई यांच्या हिंदुराष्ट्र सेना आणि संजय चांदणे जिल्हाध्यक्ष असलेल्या दलीत महासंघाने जाहीर पाठींबा देत मोठ्याप्रमाणात मतदान मिळवून देण्यासाठी आवाहन केले.. हे धर्मकार्य समजून कार्यकर्ते पाठवण्याचाही शब्द दिला.