महाराष्ट्र
ग्रामसेवकावर कारवाई करावी. टाकळीभान ग्रामस्थांचे उपोषण

ग्रामसेवकावर कारवाई करावी. टाकळीभान ग्रामस्थांचे उपोषण
टाकळीभान प्रतिनिधी- :श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत मार्फत २०१८-१९ मध्ये राबविण्यात आलेल्या दलित वस्ती योजने अंतर्गत कांबळे वस्तीसाठी पाणी पुरवठा, रस्ता, कॉक्रेटीकरण, १५ व्या वित्त आयोग म्हैसमाळे घर ते बाळासाहेब शिंदे यांचे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल प्राप्त होवूनही ग्रामसेवकावर कारवाई झाली नाही. या निषेधार्त टाकळीभान येथील ग्रामस्थ माजी ग्रा.पं. सदस्य जालिंदर संतराम बोडखे, मोहन सोनाजी रणनवरे यांनी आज दिनांक १६ मे पासून जिल्हा परिषद कार्यालय अहिल्यानगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत दि. ८ मे रोजी कार्यकारी अधिकारी जि.प. अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात संबधित ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा १६ मे रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.

