धार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्र

तळागाळातल्या अखेरच्या हिंदुच्या मनातील हिंदुत्व जागं होत नाही तोपर्यंत आपलं दायित्व थांबणार नाही- सागर बेग 

तळागाळातल्या अखेरच्या हिंदुच्या मनातील हिंदुत्व जागं होत नाही तोपर्यंत आपलं दायित्व थांबणार नाही- सागर बेग 

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी):- जागृत होत असलेल्या प्रत्येक हिंदुमुळेच एका महिन्यात मला दोन धर्मरक्षक पुरस्कारांचा मान मिळाला आहे.पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी आणखी वाढली असून तळागाळातल्या अखेरच्या हिंदुच्या मनातील हिंदुत्व जोपर्यंत जागं होत नाही तोपर्यंत आपलं दायित्व थांबणार नसल्याची प्रेरणादायी प्रतिक्रिया धर्ममरक्षक सागर भैय्या बेग यांनी व्यक्त केली आहे.

 

             धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांना बारामती येथील अहिल्यामाता होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते “बारामती हिंदू धर्मरक्षक २०२५”व अखिल भारतीय हिंदू धर्म परीषदेचा यावर्षीचा “हिंदू धर्मरक्षक” पुरस्कार महायोगी श्री श्री १००८ महामंडलेश्वर कृष्णानंद कालिदासजी महाराज यांच्या हस्ते शिर्डी येथे प्रदान करण्यात आला एकाच महिन्यात दोन धर्मरक्षक पुरस्कार मिळवणे हे श्रीरामपूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे म्हणून श्रीरामपूर शिंदे शिवसेनेच्या वतीने बेग यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सागर भैय्या बेग हे बोलत होते.

 

               छोटेखानी सत्काराला उत्तर देतांना सागर भैय्या बेग पुढे म्हणाले की,गेल्या सत्तर वर्षात सर्वधर्मसमभावच्या नावाखाली हिंदूंना संपवण्याचा कुटील डाव चालू होता. भाईचारा पाळत हिंदू आजपर्यन्त जिहाद्यांचा दहशतवाद देशात पोसत आला आहे.डाव्या विचारसरणीचे सेक्यूलर आजही हिंदू धर्माला बदनाम करण्याचे दुष्कृत्य करत आहेत अशा वामपंथीयांना ठेचण्याची गरज निर्माण झाली असून त्याशिवाय गत्यंतर नसल्याच्या उदिग्न भावना यावेळी सागर बेग यांनी व्यक्त केल्या.

 

          शिवसेनेचे जेष्ठ नेते अरुण पाटील यांनी धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांचा शाल श्रीफल व बुके देऊन सत्कार केला.एकाच महिन्यात दोन हिंदू धर्मरक्षक पुरस्कार मिळणे हे श्रीरामपूर साठी अभिमानाची बाब असून तालुक्यातील प्रत्येक हिंदूंनी सागर भैय्या यांच्या मागे ताकद उभी केली पाहिजे असे भावनिक आवाहन यावेळी अरुण पाटील यांनी केले.

 

            याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते अरुण पाटील,प्रकाश मैत्री,प्रवीण जोजारे, अशोक तुपे,उत्तमराव कल्याणकर,सुनील शेळके,रवींद्र जाधव, पवन डाबी,सागर शेटे,लखन माखीजा, गोरख जेधे, सत्यनाथ शेळके,प्रदीप करंडे, सनी थोरात,गणेश करमासे,प्रसाद दळवी आदी शिवसैनिक उपास्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे