जान्हवी व प्रमोद’ यांनी क्रांती दिनाच्या दिवशी घेतला क्रांतिकारी निर्णय ..!* देवळाली प्रवरा पॅटर्न ची राज्यभर पुनरावृत्ती होतेय याचे समाधान..! – आप्पासाहेब ढुस
*’जान्हवी व प्रमोद’ यांनी क्रांती दिनाच्या दिवशी घेतला क्रांतिकारी निर्णय ..!*
देवळाली प्रवरा पॅटर्न ची राज्यभर पुनरावृत्ती होतेय याचे समाधान..! – आप्पासाहेब ढुस
९ ऑगस्ट क्रांतिदिनी राहुरीत झालेल्या ‘जान्हवी – प्रमोद’ शुभ विवाहाने राज्यातील तरुणांना एकल (विधवा) विवाहासाठी क्रांतीचा संदेश दिला असून या विवाहाने देवळाली प्रवरा पॅटर्नची पुनरावृत्ती झाली असून याने राज्यातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे असे महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा.. प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथिल शिव चिदंबर मंगल कार्यालयात आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी दुपारी १२.३२ वा. राहुरीतील सडे येथील दत्तात्रय रंगनाथ भारुजे यांची ११ वर्षे वयाचा मुलगा असलेल्या कोरोना एकल (विधवा) असलेल्या जान्हवी यांचा त्यांच्याच सोनई येथील स्व. संभाजी बाबुराव शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या प्रमोद या दिरासोबत आदर्श पुनर्विवाह पार पडला.
या प्रसंगी बोलताना जान्हवीताई म्हणाल्या की, एकल असण्याचा एक वर्षाचा अनुभव खूब वेदनादायी होत्या, माझ्या मुलाला आणि मला भावनिक आधाराची गरज होती, आणि या पुनर्विवाह च्या निर्णयाला दिर प्रमोद यांनी त्यांचा पुतण्या हर्षवर्धन आणि मला साथ देणेचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्याची ऋणी आहे, आणि संपुर्ण परिवार व महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, शिवाजी घाडगे यांनी विशेष प्रयत्न केले.
या प्रसंगी बोलताना प्रमोदणे सांगितले की, एकल वहिनी, आणि पुतण्या हर्षवर्धन यांचे गेल्या वर्षभरातील एकाकी जीवन मन हेलावून टाकत होते, वहिनीला व पुतण्याला आधाराची गरज होती म्हणून मी हा निर्णय घेतला.
प्रसंगी बोलताना महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस म्हणाले की, जुन्या रूढी व परंपरांना झुगारून देत महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ महिन्याचे बाळ असलेल्या कोरोना एकल (विधवा) महिलेचा देवळाली प्रवरा येथे राज्यातील पहिला विवाह लावून देणेत आम्हाला सर्वप्रथम यश आले. या ऐतिहासिक प्रसंगाची दखल संपूर्ण राज्याने घेतली, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालिताई चाकणकर, राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या तत्कालीन मंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी थेट आम्हाला दूरध्वनी द्वारे संपर्क करून वधू वरासह समितीचे सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राहुरी तालुका कार्यकारीनिवर माझे खांद्याला खांदा लावून काम करीत असलेले सचिव प्रशांत कराळे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी घाडगे आदींसह जेंव्हा आम्ही राहुरी तालुक्यातील एकल भगिनींच्या समस्या जाणून घेनेसाठी त्यांची माहिती घेत होतो तेंव्हा राहुरी तालुक्यातील माहेर असलेल्या व सोनई मध्ये सासर असलेल्या जान्हवी ताई चे पती कोरोनाने दगावलेचे आम्हाला समजले, समितीचे सर्व सदस्य आम्ही त्यांना दुखवट्याच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जून २०२१ मध्ये सोनई येथे त्यांच्या सासरी दारावर भेटायला गेलो असता त्यांच्या १० वर्षे वय असलेल्या मुलाच्या भवितव्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला.., तथापि त्यांनी लगेच नकार देत सद्या तरी तसे काही विचार नसल्याचे सांगितले होते, परंतु जेंव्हा देवळाली प्रवरा येथे नऊ महिन्याचे बाळ असलेल्या एकल महिलेचा पुनर्विवाह झाल्याचे व त्या लग्नाचे राज्यात सर्वत्र कौतुक झाल्याचे त्यांना समजले तेंव्हा त्यांच्या मनावरील सामाजिक दडपण काहीसे कमी झाले व त्यांनी दुसऱ्या भेटीत पुनर्विवाह बद्दल सकारात्मकता दाखविली.
सासर माहेर दोन्ही बाजूला चर्चा झाली आणि अखेर हो ना करता त्यांच्याच दिरासोबत हा विवाह जुळून आणनेत समितीला यश आले.
आज जानव्हीताई त्यांच्या अकरा वर्षे वयाच्या मुलाच्या साक्षीने त्यांच्याच बिगर लग्नाच्या प्रमोद शिंदे या दिरा सोबत राहुरी येथे थाटामाटात विवाह संपन्न झाला. व त्यांनी दुसऱ्यांदा सुखाचा संसार उभा केला आहे..
जाणव्ही ताई व प्रमोदणे हे धाडसी पाऊल उचलून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, सचिव प्रशांत कराळे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शिवाजी घाडगे आदींनी जान्हवी व प्रमोदचे अभिनंदन केले.