पिसाळलेल्या कुत्र्याचा पन्नास जणांवर हल्ला: श्वानाला केला जेरबंद*
*आळंदीत पिसाळलेल्या कुत्र्याचा पन्नास जणांवर हल्ला: श्वानाला केला जेरबंद*
आळंदी/ येथे असणारे भागीरथीनाला परिसरामध्ये प्रचंड जाण्याचे साम्राज्य आहे त्यामुळे कुत्र्यांचा वावर तिथे दिवसेंदिवस वाढत असतो त्याचप्रमाणे आळंदी शहरांमध्ये विविध भागांमध्ये मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येतात याच परिसरामध्ये येता जाता बागेतील आल्यावरून जाणाऱ्या सुमारे 50 जणांवर पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन त्यांना जखमी केले. यामध्ये वैद्यकीय उपचार घेत असतात पिसाळलेल्या श्वानाचा मात्र हल्ला चालूच होता.
परिसरातील नागरिकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सदरच्या पिसळलेल्या श्वानाला जेरबंद करण्यासाठी हालचाली केल्या आणि अखेर सदर श्वान घेरबंद करण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडून सांगण्यात आले.
आळंदीतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढली आहे त्याचबरोबर कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते मोकाट कुत्र्यांमुळे टू व्हीलर वाल्यांचे एक्सीडेंट होण्याची शक्यता वाढताना दिसते. यामध्ये केके हॉस्पिटलच्या समोरील व आता रस्ता आणि तेथील मोकाट कुत्र्यांचे टोळके यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. असाच प्रकार विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्त मंदिर रोड या ठिकाणी शिक्षणासाठी येत असणाऱ्या मुला-मुलींवरही ओढवतो आणि त्या मुला मुलींवरील या भटक्या कुत्र्यांचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी आहे. प्रशासनाने विविध दखल घेत या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे आळंदीतील मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून लहान मुले वृद्ध यांना सर्वात जावा घेतल्याच्या घटना वेळोवेळी घडत आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेने त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याचबरोबर भागीरथीनाला येथील कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर महाद्वार के के हॉस्पिटल चा परिसर या ठिकाणी मात्र मोकाट कुत्र्यांची टोळके नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेने दखल घ्यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.