चप्पल दुकानाला आग,लाखो रुपयांचा माल जाळून खाक
* चप्पल दुकानाला आग,लाखो रुपयांचा माल जाळून खाक*
सोनई येथील नदीपात्रातील असलेल्या चप्पल दुकानाला काल( २२ रोजी) पहाटे ६ च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत अंदाजे लाखाच्या आसपास दुकानात असलेल्या चप्पल, बांगडी,व फ्रुट याचा जळून खाक झाल्याची घटना घडली.
या बाबद माहिती की,नदीपात्रात सुनील कुंडलिक साळवे यांचे चप्पल दुरुस्ती व विक्रीसाठी काही प्रमाणात माल होता,त्याच एक छतीदुकानात पापाभाई यांचे बांगडी विक्रीचे व्यवसाय होता,तसेच त्या ठिकाणी सलीम बागवान यांचे फ्रुटविक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांचाही सफरचंद, केळी,द्राक्षे,आदी माल होता तोही आगीच्या भक्ष्यस्थानी झाला.त्यामुळे दुकानातील सर्व माल व दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा झाला नसल्याचे समजले.
ही घटना घडली तेव्हा नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. दरम्यान मुळा कारखान्याची अग्निशामक तात्काळ आली होती. हे तीनही व्यवसायिक हातावर पोट भरत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजारील दुकानांमध्ये ही आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगी संधारबात वेगळीच चर्चा होत आहे, कोणीतरी अज्ञात इस्मानी हे खोडसाळ कृत्य केल्याची चर्चा आहे.