झापवाडी हद्दीतील बाजारक्षेत्र घोडेगाव मद्धे समावेशकामी आयुक्तांकडून कार्यवाहीचे निर्देश- सुधीर वैरागर
झापवाडी हद्दीतील बाजारक्षेत्र घोडेगाव मद्धे समावेशकामी आयुक्तांकडून कार्यवाहीचे निर्देश- सुधीर वैरागर
घोडेगाव झापवाडी हद्दीतील बाजारक्षेत्र घोडेगावमद्धे समावेशकामी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना समयोचित निर्देश दिले असल्याची माहिती फुले- शाहू आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली
या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर नाथा वैरागर यांनी सांगितले की घोडेगाव- झापवाडी या ग्रुप ग्रामपंचायत चे विभाजन करून झापवाडी या गावाला स्वतंत्र महसुली गावचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी झापवाडी ग्रामस्त यांनी केल्याने महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई- 32 यांचे समयोचित आदेशानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिनांक 3/06/1991 रोजीच्या आदेश्यानुसार झापवाडी या गावाला महसुली दर्जा दिल्याबाबत जाहीर केले आहे. परंतु तत्कालीन कार्यवाही मद्धे घोडेगाव- झापवाडी महसुली गावचे विभाजन गटानुसार झालेले असून महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार घोडेगाव झापवाडी शिव निश्चित केलेली नसल्याने घोडेगावचे बाजार क्षेत्राचा झापवाडी या नवीन महसुली गावामद्धे समावेश करण्यात आलेला आहे.
घोडेगाव बाजार महाराष्ट्र यात सुप्रसिध्द असून सदरचा बाजार झापवाडी महसुली हद्दीत समाविष्ट झाल्याने घोडेगाव चे वैभव समुपष्टात आले असून घोडेगावचा बाजार घोडेगाव महसुली हद्दीत आणण्यासाठी सामाजिक बांधिलकीतुन शक्य तितके प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुधीर नाथा वैरागर यांनी नमूद केले आहे.
घोडेगाव येथील अनुक्रमे
1 ) श्री घोडेश्वरी देवी 2) श्री विठठल देव आणि बाजार क्षेत्र यांचे शासकीय हस्तांतरन झाले असून घोडेगाव चे वैभव परत मिळवण्यासाठी संघर्ष चालू आहे
सुधीर नाथा वैरागर
सामाजिक कार्यकर्ते