देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व बेलापुर ग्रामपंचायत शतकपुर्ती महोत्सवानिमित्त सर्व धर्मीय संत महंताच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व बेलापुर ग्रामपंचायत शतकपुर्ती महोत्सवानिमित्त सर्व धर्मीय संत महंताच्या हस्ते ध्वजारोहण

 

 

बेलापुर (प्रतिनिधी )-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बेलापूरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला बेलापुर गावातील मुख्य ध्वजारोहण हे सर्व धर्मीय संत महंत व पोलीस तसेच जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक यांच्या शुभहस्ते करुन ग्रामपंचायतीने एक वेगळाच आदर्श घालून दिला बेलापुर गावाला आदर्शवत घडविणारे सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक लक्ष्मण डोखे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर समाजाला सतत चांगला उपदेश करणारे सतं महंत महेश व्यास महानुभाव मठाचे कृष्णराज लाड बाबा सेंट पिटर चर्चचे पालक चंद्रकांत ओहोळ बेलापुरातील मुख्य जामा मस्जिदचे मौलाना शकील अहमद शेख आदि धर्मगुरुंच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले .सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते बेलापुर पोलीस स्टेशनचे तर बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे प्रकाश पा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बेलापुर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या तबसुम बागवान,स्वाती अमोलिक,सौ.शिला पोळ यांच्या हस्ते तर मराठी मुले व मुलींच्या शाळेचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोफेल सय्यद यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्दू शाळेचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी डाँक्टर आजिम शेख,अँड.अयाज सय्यद, आसायी समीर शेख,इंजिनिअर स्वालिया कदिर सय्यद, रूजदा इकबाल शेख,नईम फकीर आतार यांच्या हस्ते करण्यात आले बेलापुर जे टी एस हायस्कूलचे ध्वजारोहण राजेश खटोड यांच्या हस्ते करण्यात आले.रामगड येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेत दिपक निंबाळकर यांच्या हस्ते 

 ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट गावडे व देविदास देसाई यांनी केले.नवनाथ धनवटे यांच्या संदीप ढोल पार्टी ने डोलीबाजा वाद्याचे वादन करून वातावरण निर्मिती केली.साई इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले.ध्वज स्तंभा भोवती केलेली सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी फटक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाळांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी विविध मान्यवर,पत्रकार,सर्व संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महसुल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रँलीचे बेलापूरात जोरदार स्वागत करण्यात आले उपविभागीय अधिकारी अनिल पवार व पोलीस निरीक्षक संजय सानप,गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस,मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे