श्रीरामपूर मधून माळी महासंघाचा सागर बेग यांना जाहीर पाठिंबा – राजेंद्र अनाप

श्रीरामपूर मधून माळी महासंघाचा सागर बेग यांना जाहीर पाठिंबा – राजेंद्र अनाप
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- हिंदू धर्म आज अत्यंत कठोर अशा संकटातून जात आहे मोठ्या प्रमाणात होत असलेले धर्मांतर आणि जिहादी प्रवृत्तीं मुळे हिंदूंवर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी एकमेव असे हिंदुत्ववादी उमेदवार सागर बेग यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय उत्तर नगर जिल्हा माळी महासंघाने घेतल्याने श्रीरामपूर मतदारसंघातील भल्या भल्यांचे राजकीय गणिते चुकणार आहेत.*
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आरोप प्रती आरोपांच्या फैरी झडत असल्यातरी पाच वर्षाचा वचपा,अंतर्गत कलहाचा फायदा अपक्ष उमेदवार सागर बेग यांना मिळताना दिसत आहे.उत्तर नगर जिल्हा माळी महासंघाने अपक्ष उमेदवार सागर बेग यांना जाहीर पाठींबा देत प्रचार यंत्रणेत प्रत्यक्ष सहभाग घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाने उत्तरेकडील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.*
उत्तर नगर जिल्ह्यातील विशेषतः श्रीरामपूर,राहता तालुक्यातील माळी मतांवर माजी आमदार जयंतराव ससाणे यांची एकहाती पकड राहिलेली आहे.त्यांच्यानंतर मात्र ती किमया त्यांचे चिरंजीव व श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करन ससाणे यांना जमलेली नाही असे उत्तर नगर जिल्हा माळी महासंघाचे उप जिल्हाध्यक्ष राजेंद्र अनाप यांनी अपक्ष उमेदवार सागर बेग यांना जाहीर पाठिंबा दिल्याने उघड झाले आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता,श्रीरामपूर मतदारसंघातील माळी मतांच्या समीकरणावरच विद्यमान आमदार लहू कानडे यांची उमेदवारी छाटून नवख्या हेमंत ओगले यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे.
माळी समाजातील अंतर्गत कलह असतील किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने आज माळी समाज करन ससानेंच्या मागे नसल्याचे अनाप यांच्या पाठिंब्याने स्पष्ट झाले आहे.त्यामुळेच अपक्ष उमेदवार सागर बेग यांना मतदारांमधून वाढती पसंती मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.