पंढरी च्या वारीची लगबग सुरू.. माऊलींचे अश्व 20 जूनला पोहचणार आळंदीत
पंढरी च्या वारीची लगबग सुरू.. माऊलींचे अश्व 20 जूनला पोहचणार आळंदीत
गेल्या सुमारे १८९ वर्षापासून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावाचे. शितोळे सरकार यांचा माऊलींच्या पालखी सोहळ्यात अश्र्वाचा मान आहे. माउलींच्या पालखीचे आतुरतेने भाविक भक्त वाट पाहतात.तशी ते माउलींच्या अश्र्वाचेही मोठ्या भक्री भावात स्वागत करतात. कर्नाटकच्या बेळगावातील अंकली संस्थान चे विश्वस्त उर्जितसिंह राजे शितोळे.आणि महादजी राजे शितोळे यांनी माउलींच्या अश्र्वाचे १० जून ला अंकली हून पुण्याकडे प्रस्तान होणार असेलची माहिती दिली आहे. पालखी पूर्वी १२ दिवस म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध एकादशीला १० जून ला दोन्ही अश्र्वांचे सकाळी ९ ला प्रस्थान आहे. या अश्र्वांचे मिरज- पेठ नाका-सातारा मार्गे हे अश्व शनिवारी दिनांक १८ जून ला सायंकाळी पुण्यात आगमन होणार आहे. पुण्यात हे दोन्ही अश्व एक दिवस मुक्काम करतील आणि दि २० ला पुण्याहून आळंदी साठी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रस्थान ठेवतील