मांजरी प्राथमिक शाळेमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मांजरी प्राथमिक शाळेमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मांजरी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल विटनोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक पर भाषणामध्ये नवनाथ खंडागळे यांनी प्रजासत्ताक दिना बद्दल उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांना माहिती देत शासनाच्या हर घर तिरंगा चे महत्व पटवून दिले.
यावेळी चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हर घर तिरंगा, तेरी मिट्टी, मा तुझे सलाम अशा विविध गाण्यांवर नृत्य कला सादर करत उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
या वेळी कार्यक्रमाला सोपान बाचकरअशोक विटनोर ,युवा कार्यकर्ते भाऊसाहेब विटनोर ,काशिनाथ भिसे ,दादाभाऊ विटनोर ,कोंडीराम विटनोर ,उपसरपंच मच्छिंद्र घोलप ,अनिल पोळ तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ विटनोर यांनी केले. तसेच आभार पतंगे सर यांनी मानले. कार्यक्रम सुशोभित करण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमतीकदम मॅडम, गौरीधर मॅडम, चिलेकर मॅडम ,पाटोळे मॅडम, पंडित मॅडम तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.