बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांचा दहा लाख रुपयांचा विमा
बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांचा दहा लाख रुपयांचा विमा
बेलापूर बुद्रुक विकास सोसायटीच्या वतीने सभासदांचा दहा लाख रुपयेचा विमा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री सुधीर नवले यांनी दिली आहे 7 स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वार्षानिमीत्त संस्थेच्या 18 ते 65 वय असलेल्या सभासदांचा अपघाती विमा उतरण्याचा मानस संचालक मंडळांनी घेतला आहे. शेतकरी सभासदांना अपघात झाला तर त्या कुटुंबाला मदत मिळत नाही अशावेळी शेतकऱ्यांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे संस्थेच्या वतीने अशा कुटुंबांना आधार व्हावा या संकल्पनेतुनसभासदांचा विमा उतरविण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे अपघाती निधन झाले तरी त्यांच्या वारसा10/-लाख रुपये विमा कंपनी देणार तसेच अपंगत्व आले तरी 10/-लाख रुपये मिळणार असून दवाखान्यासाठी एक लाख रुपये व किरकोळ जखमी असेल तर तीस हजार रुपये हॉस्पिटल बिल व इतर कारणासाठी मिळणार तसेच कायम अपंगत्व आल्यात 10/- लाख रुपये किरकोळ जखमी असेल तर 30 हजार हॉस्पिटल बिल व इतर कारणा साठी मिळणार दवाखाना खर्च तसेच पॅरँलिसीस झाल्यास 10/-लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा. पंडितराव बोंबले संचालक अशोक कु व्हे, किशोर नवले, अरुण पाटील नाईक , शेषरावदादा पवार , शिवाजी पाटील वाबळे, विश्वनाथ गवते , विलास मेहेत्रे , राजेद सातभाई, सविताताई मेहत्रे,, अंतनो अमोलिक, इंदूमती शेळके, भाग्यश्री खडागळे,व सचिव विजय खंडागळे दिली