पोहण्यासाठी गेलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू तर एक बचावला…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान टेल टँक येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन कॉलेज मित्रांपैकी, एकचा बुडून मृत्यू झाला, तर एकच वाचवण्यात यश,
सदर घटना टाकळीभान येथे रविवार दि. 22 मे रोजी दुपारी एक वाजता घडली. तीन कॉलेज तरुण मित्र स्वराज कोकणे, सुदर्शन कापसे, निरंजन वाघुले टेल टॅंक येथे पोहण्यासाठी गेले असता ,सोबत त्यांनी पोहण्यासाठी हवेची ट्यूब साधने घेतली होती. स्वराज कोकणे व सुदर्शन कापसे हे ट्यूब च्या साह्याने पोहण्यासाठी शिकत होते परंतु पोहत असताना वाऱ्या च्या वेगाने पाण्याचा वेग वाढल्याने लाटा उसळल्याने त्या दोघांच्या पोटा खालची टुयब सटकली, हे त्यांचे सोबत पोहण्यासाठी गेलेले मित्र निरंजन बाळासाहेब वाघुले याच्या लक्षात आले त्यांनी सुदर्शन यांना वाचवले , परंतु तोपर्यंत स्वराज कोकणे हा पोटा खालची ट्यूब सटकल्याने बरसीच्या खोल गेल्याने त्याला वाचविण्यात अपयश आले. तो सापडे नासा झाल्याने त्या दोन मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर गावातील ग्रामस्थ गोळा झाले, स्वराज याचा शोध वीस ते पंचवीस जण अथक प्रयत्न करीत होते ,शोध घेण्यासाठी तब्बल 6 घंटे लागले, यावेळी नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे निरंजन दरेकर यांचे पथक दाखल झाले होते, तरीही शव सापडत नव्हते, सर्वांनी अथक प्रयत्न केले, शेवटी भाऊसाहेब नानासाहेब पवार ही इतरांबरोबर शोधण्याचे काम करत असताना त्यांना स्वराज शव शोधण्यात यश आले, यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर मुरकुटे , अशोक नाना कानडे, अरुण नाईक, राजेंद्र कोकणे हे ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने लगेच घटनास्थळी हजर झाले. प्रा.सुरेश (बापूसाहेब) गोपीनाथ कोकणे यांचे स्वराज कोकणे ( वय १८) हे एकुलते एक चिरंजीव असल्याने टाकळीभान परिसरामध्ये या घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
Rate this post