केबल चोरी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

केबल चोरी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.
सोनंई येथील चिमटा वस्ती श्रीरामवाडी येथील बाबासाहेब सुभाष निमसे यांनी सोनंई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली कि मी दिनांक २१/५/२०२२रोजी ऊसाला पाणी देण्यासाठी नवीन २-५केबल टाकली होती ऊसाला पाणी देऊन सायंकाळी आठच्या सुमारास मोटार बंद करुन घरी गेलो दि २२रोजी सकाळी ९-३० चा सुमारास मी माझ्या सोनई शिवारातील ऊसाला पाणी देण्यासाठी बोरची मोटार चालु करण्यासाठी गेलो असता मला खोक्या पासुन बोर पर्यत केबल दिसली नाही मग मी वडिलांना फोन केला व सांगितले कि आपल्या खोकया पासुन बोर पर्यत केबल दिसत नाही तुम्ही कुणाला दिली का त्यांनी सांगितले मी कुणालाही दिली नाही ते तात्काळ शेतात आले आम्ही दोघांनी मिळुन शेतात शोध घेतला असता केबल मिळवुन आली नाहीं त्यानंतर आमच्या शेजारील भाऊसाहेब शंकर बेल्हेकर’; अजय आबासाहेब दरदले;अमोल पांडुरंग दरदले सर्व रा सोनई शिवार यांनाही फोन करुन माझ्या मोटारींची केबल चोरीला गेली आहे त्यांनी आप आपल्या केबल चेक केल्या असता त्याही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या असल्याचे लक्षांत आले त्या बाबद बाबासाहेब सुभाष निमसे यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहेअधिक तपास सोनई पोलीस करीत आहेत