श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात एक पोलिसासह इतर एक जण जखमी.
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चाकूने अंदाधुंद वार एक पोलिसांसह इतर एक जण जखमी
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीने समोर दिसेल त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यात एक पोलीस व एक कामानिमित्त आलेल्या व्यक्तीवर वार झालेली आहे. ज्यात कोल्हापूर येथील मोहिनी विद्यापीठात जीवशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला विजय मच्छिंद्र बर्डे हा दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील चितळी येथे माहेरी असलेली पत्नी शैला बर्डे हीस घेण्यासाठी आला होता. त्यावेळी एकमेकांमधे झालेल्या वादातून विजय बर्डे यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शैला हिच्या डोक्यात फरशी टाकून तिला जखमी करून, विजय बर्डे हा फिर्याद देण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आला असता, दुपारी अडीच ते तीन वाजे दरम्यान आरोपी विजय बर्डे याने त्याच्या जवळील चाकूने अंदाधुंद वार केल्याने, तालुका पोलिस ठाण्यात चरित्र पडताळणी साठी आलेल्या पाथरवाला जिल्हा परिषद शाळा नेवासा राहणार टाकळीभान येथील प्राध्यापक किशोर शिंदे यांच्या पाठीवर व कानावर वार केलेले आहे. तसेच माळवाडगाव बिटचे पोलीस नाईक संतोष रामकिसन बडे यांच्या दंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याने पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उडाली. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सदरच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली, पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तालुका पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात पोलीस फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजते.