शाळा महाविद्यालय यांना राहुरी पोलिसांकडून जाहीर आवाहन

शाळा महाविद्यालय यांना राहुरी पोलिसांकडून जाहीर आवाहन
महाविद्यालय परिसरामध्ये मुलींची छेड काढण्याच्या , टिंगल टवाळी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात प्रवेश नसलेल्या टारगट मुलांना ओळखण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरित केलेले असणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी ती ओळखपत्र स्वतःजवळ बाळगणे ही गरजेचे आहे.
परंतु बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ओळखपत्र वेळेत वाटप होत नाही किंवा वाटप झालेले असले तरी विद्यार्थी सदर ओळखपत्र जवळ बाळगत नाही असे निदर्शनास आलेले आहे.
तरी मुलींच्या छेडछाडीच्या तसेच अन्य तक्रारीं बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना चा भाग म्हणून सर्व महाविद्यालयांना आव्हान करण्यात येते की आपापल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओळखपत्रे बाळगण्याची समज द्यावी.
तसेच महाविद्यालयात दुचाकी घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लायसन्स तथा हेल्मेट असणे बंधनकारक आहे याबाबत पालकांनी योग्य ती दक्षता घ्यावी. असे आवाहन सर्व शाळा व महाविद्यालय यांना राहुरी पोलीस स्टेशन आवाहन करण्यात आली आहे.