ब्रेकिंगमहाराष्ट्र

जीवनात वेड हे असलच पाहिजे पण ते धेय्याच सत्याचा, व सात्विक होण्याचं असाव*  

* जीवनात वेड हे असलच पाहिजे पण ते धेय्याच सत्याचा, व सात्विक होण्याचं असाव*  

 

एखाद्या विषयाचा बाबीचा आपल्यावर एवढा प्रभाव होण कि त्या प्रभाव समोर आपण स्वतःला समर्पित करण प्रभाव जिकडे घेऊन जाईल तिकडे आपण जाण म्हणजे वेड पण हे वेड चांगलही असतं आणि वाईटही असतं आपण कोणत वेड लाऊन घेतो त्यानुसार आपली प्रतिमा ठरते .आपल्या जीवनातील आपल्याला लागलेलं एखाद्या विषयाच वेड हे नशेच्या दिशेने घेऊन जाऊन जीवन उध्वस्त करणार नसलच पाहिजे .वेड असणं हे जरी गैर नसलं तरी ते जर निर्थक विषयाचं लागलं आणि त्याच नशेत रूपांतर झालं तर मग मात्र ते वेड आपलं आयुष्य उध्वस्त करून सोडत .

 

कोणत्याही क्षेत्रातील गोष्टीचा आपल्यावर किती प्रभाव होऊ देयचा हे सर्वस्वी आपल्यावर अंवलबुन असत. निर्थक बाबीच वेड हे आयुष्य बरबाद करणार ठरत असल्याने जीवना विषयी आपण खूप सजग आणि जागृत राहण्याची आवश्यकता असते. पण खरंच आपण एवढे सजग आणि जागृत असतो का तर बहुतांश वेळा नाही किंवा खुप अल्प प्रमाणात जागृत असतो‌ . त्यामुळे जीवनात अनेक पडझडी होतात चढ उतार येतात आणि त्याचे दृश्य परिणाम पण आपण भोगतो पण हे सगळं का होत तर याची मुळ पार्श्वभूमी हि हिच आहे कि आपल्याला लागलेलं वेड हे निरर्थक विषयाचं होत .

 

म्हणून वेड असलच पाहिजे पण ते असणारं वेड हे योग्य धेय्याच ,विधायक, कार्यच आणि सात्विक, वृत्तीच, सत्यनिष्ठ मार्गाने मार्गक्रमण करण्याचं , परोपकार , निस्वार्थ भाव,लोक कल्याणासाठी आयुष्य समर्पित करण्याच सदाचार,या बाबीच असलं पाहिजेनक्कीच असलं पाहिजे.तेव्हाच आपल्याला योगायोगाने मिळालेल आयुष्य कारणी सार्थकी लागत . नाही तर आयुष्य उध्वस्त होऊन निरर्थक गेलं म्हणून समजायचं .आपलं जीवन हे जरी न उलगडणार कोड असलं तरी आपल्या वाट्याला आलेल आयुष्य हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जगावच लागत आपण त्या पासून पळ काढु शकत नाही हे वास्तव सत्य आहे.पण हेच जीवनातील क्षण जगत असताना वेगवेगळ्या विषयांना भुमिकांना सुद्धा आपल्याला समोर जावं लागतं . त्याच वेळी आपल्यावर आपल्या वेडचा परिणाम जीवन उद्ध्वस्त करणारा नसावा हा असाच प्रकार आहे . प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या तरी विषयांवर बाबींवर वारंवार चिंतन करून त्या पद्धतीने आपलं आयुष्य घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो .

 

 

पण याच दरम्यान आपण कोणत्या विषयाचा वेड स्वतः ला लावुन घेतो त्यावर आपलं चांगलं वाईट भविष्य अंवलबुन असत आणि या मध्ये वेळेच खुप महत्व असतं म्हणजे एकंदरीत वेळ आणि वेड याच सुयोग्य नियोजन झालं आणि पथ योग्य असेल तर मग जीवन सार्थकी लागला म्हणून समजायचं आणि जर वेळ वेड याच नियोजन चुकलं आणि दिशाही चुकली तर मग मात्र आपलं जीवन उध्वस्त होऊन पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या हातात काहीच उरत नाही.महणुन जीवन पथावर मार्गक्रमण करत असताना जीवनात वेड हे असलच पाहिजे पण ते धेय्याच, सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचं, आणि सात्विक होण्याचं असलं पाहिजे .तर आणि तरच ह्या वेडाच आपल्याला सदउपयोग होतो . अन्यथा वेड हे जीवन बरबाद केल्या शिवाय सोडत नाही. म्हणजे एक तर यशोशिखरावर जाण्यासाठी किंवा आयुष्य बरबाद करण्यासाठी या दोनच परस्पर विरोधी बाबींसाठी आपल्या आयुष्यात आपल्याला लागणार्या वेडाचा उपयोग होत . म्हणून कोणत वेड लागलं पाहिजे याचं अगोदर मुल्यमापन करणं गरजेचं आहे. वेडाचे जे दोन प्रकार आहेत त्यापैकी एक परिणाम आपल्याला मिळण निश्चित असतो .आयुष्यच कल्याण किंवा आयुष्य बरबाद या पैकी कोणता परिणाम निवडायचा आणि कोणता परिणाम स्वीकारायचा हे सर्वस्वी आपल्यावर अंवलबुन असत .आणि याच दरम्यान आपल्या आजूबाजूला असणार वातावरण परिसर , संस्कार ,याचा सुद्धा आपल्या वेडावर खुप मोठा परिणाम असतो . आपलं वेड हेच आपलं आयुष्य आणि भविष्य निश्चित करत असत . म्हणून आपण आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत असताना वेळ काळ परस्थिती खुप महत्वाची असती ,बाल वयात योग्य ज्ञान अभ्यास केला तर त्याचे परिणाम आपल्याला युवा अवस्थेत पाह्यला मिळतात आणि आणि युवा अवस्थेत,संयम, स्थिरता, सत्यता, सात्विकता, वैचारिक प्रगल्भता, सुसंगती, आणि आध्यत्मिक आचरण असेल तर जीवनातील खुप मोठे अनर्थ टळतात . म्हणून वेड असण हे गैर नाही पण ते कशाच आहे यावर खुप काही अंवलबुन असत.आणि त्यानूसार परिणाम पण येतात, म्हणून जीवनातील सार्थकता सोधणार वेड हे नक्कीच आपल्याला योग्य ठिकाणी पोहचवत आणि निरर्थक वेड हे आयुष्य उध्वस्त करत म्हणून जीवनात वेड हे जरूर असलं पाहिजे पण चांगल्या बाबीच , सात्विक विचारांच अध्यात्मिक ज्ञानाच , जीवन सार्थकी लावण्याच असलच पाहिजे

 

*गणेश खाडे* 

 

*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे