अहमदनगर जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह टोल नाका व बाजार उडाल्याने तारांबळ
बीड अचानक सुरू झालेल्या वादळी वार्याने खरवंडी येथील टोल नाका उडुन गेला पाथर्डी तालुक्यातील खरवंडी गावामध्ये आठवडी बाजाराची दाणादाण उडाली. रविवार ता. 5 रोजी दुपारी अडीच वाजता अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वारा सुरू झाला. त्यामुळे बाजारासाठी
आलेल्या व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांच्या दुकाना वाऱ्याने उडाल्या. विक्री साठी आणलेले साहित्य उडाले. धुळीचे लोट परिसरात निर्माण झाल्याने व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते.व खरवंडी जवळचा टोल नाका ही उडुन पडला व कोनतीही जिवीत हानी झाली नाही