प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप*
पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,पुणे जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूरच्या दिशेने पायी चालत चाललेल्या वारकऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवाध्यक्ष प्रणव बुर्डे व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने आजपर्यंत विविध प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. कोविड व लॉकडाऊन काळात गोर-गरिबांना अन्नधान्य, ज्या भागात महापुरामुळे कुटुंबाचे नुकसान झाले त्यांना संघटनेचे माध्यमातून मदत करण्यात आली.
वारकरी बांधव विठ्ठलाच्या भक्तीभावाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत चालत आनंदाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊन तेथे साकडे घालतात. मी माझ्या शेतामध्ये पेरणी केली आहे माझे शेत बहरून येऊ दे, आबादन होऊ दे त्यासाठी विठ्ठला पाऊस वेळेवर येऊ दे, आमच्यावर कृपादृष्टी कर अशी भावनिक साद सर्व वारकरी विठ्ठल चरणी घालून आपल्या गावी परत येतात. अशा वारकरी बांधवांसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नेहमीच पुढे असेल असे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व वारकरी बांधव उपस्थित होते.