वांगी बुद्रुक मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.
वांगी बुद्रुक मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे सालाबाद प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दत्तात्रय कोपनर यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
31 मे 2022 रोजी 297 जयंती साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला व विचारांना या वेळी उजाळा देत तरुण पिढीने सर्वांनी त्या पद्धतीने आचरण ठेवावे असे यावेळी सरपंच बाबासाहेब येळे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने, धनगर समाज युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सचिन राऊत, वांगी खुर्द सरपंच काकासाहेब साळे, एल्गार सेना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष किशोर पारखे, जनार्धन विटनोर ,अमोल खेमनर ,वांगी खुर्द सदस्य गिरीश येळे,सुनील हलनोर, राहुल पवार, उमेश साळे, चांगदेव येले, सागर मेकडे, दत्तात्रेय पिसाळ, राहुल साळे, जालिंदर विटनोर, स्वप्निल साळे, गोवर्धन कोपनर ,काका लाटे. आदी नागरिक उपस्थित होते