इलेक्ट्रॉनिक मोटारी चोरी करणाऱ्यास शिंगणापूर पोलिसांनी केली अटक

इलेक्ट्रॉनिक मोटारी चोरी करणाऱ्यास शिंगणापूर पोलिसांनी केली अटक
नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
दि. १ रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी व चालक पो. हे. काॅ. तेलोरे हे गस्त घालत असताना, कांगोणी गावच्या हद्दीतील एका हॉटेलच्या मागे चोरी होत असल्याची माहिती मिळाली.
या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि आरोपींना अटक केली. तपासात आरोपींची नावे सुनील दत्तात्रय चाफे आणि विशाल मुळे, दोघेही रा. जळके (खुर्द) असे असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून १०,००० रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार आणि ३०,००० रुपये किंमतीची दुचाकी (एमएच २० एडब्ल्यू ३१६०) असा एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी अधिक चौकशीदरम्यान, परिसरातील इतर चोरीच्या घटनांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरोपींना पोलीस कोठडीत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम ३०३(२), ६२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे करीत आहेत.