बाजाराच्या दिवशीच भर बाजारपेठेत गोळीबार झाल्याच्या चर्चेने शहरात खळबळ
बाजाराच्या दिवशीच भर बाजारपेठेत गोळीबार झाल्याच्या चर्चेने शहरात खळबळ
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अनधिकृत भोंग्यां बाबत निवेदन दिल्यानंन्तर असंख्य कार्यकर्त्यां बरोबर राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग चहा पाणी घेत बसलेल्या ठिकाणीच लोडेड पिस्तूलातून फायर करून पसार झालेला जिहादी मानसिकतेचा हुजेफ शेख पोलिसांच्या तावडीत सापडेलच पण या जिहादी प्रवृत्त्या पोसणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवुन द्यायची वेळ आता आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.
शुक्रवार बाजाराच्या दिवशीच भर बाजारपेठेत गोळीबार झाल्याच्या चर्चेने शहरात हाहाकार माजला पण या जिहादी मानसिकतेच्या प्रवृत्त्या पोसणारेच शहरात गुंडगिरी वाढल्याच्या वावड्या उठवत राजकारण करत असल्याचे सिद्ध होत आहे.दुपारी साडे बाराच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रोडवर झाले असे की,गिरमे चौकातील ग्रॅज्युएट चहा समोरील चहाच्या दुकानात धर्मरक्षक सागर भैय्या बेग आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह चहा पाणी घेत होते त्याच दरम्यान ग्रॅज्युएट चहाच्या बाजूने दोन इसम उभे होते त्यांच्या जवळ उभा असलेला हुजेफ शेख हा अनुचित प्रकार घडवण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी उभा होता त्याचा संशय आल्याने धर्मरक्षक संघर्ष दिघे हे त्याच्या दिशेने जात असतांना त्याने त्याच्याकडील लोडेड पिस्तूल काढून फायर करण्याच्या उद्देशाने रोखले परंतु तेथे उपस्थित असलेल्या धर्मरक्षकांनी त्याच्याकडे एकाचवेळी धाव घेतल्याने गांगरलेला जिहादी तेथून ससाणे निवास्थाच्या दिशेने पळू लागला तेंव्हा त्याच्या मागे धर्मरक्षक संघर्ष दिघे व काहीजण पळाले तेंव्हा त्याने पळतापळताच मागे वळून गोळीबार केला त्या गडबडीत तो पडला पण त्याही अवस्थेत तो फरार होण्यात यशस्वी झाला.
श्रीरामपूरच्या राजकारणात धर्मरक्षक सागर बेग यांच्या धडाकेबाज इंट्रीने बिथरलेले संधीसाधु पुढारी शहरात गुंडगिरी वाढत असल्याच्या वावड्या उठवत आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत.काही विघ्नसंतोषी स्वयंघोषित नेते शहरातील भुरट्या टोळ्या एकत्र करून धर्मरक्षक सागर बेग यांना शह देण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील करत आहेत.सत्तर वर्षात पोसलेली जिहादी मानसिकता आता गुन्हेगारीच्या चरम सीमेवर आल्या सारखी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.जिहादी गुन्हेगारी प्रस्तापित पुढऱ्यांनीच पोसायची त्यांच्याबरोबर ईफ्तार पार्ट्या झोडायच्या हे वर्षानुवर्षे अखंड अविरत चालू आहे.याच लाडाचा परीपाक आता अशा घटनांच्या माध्यमातून समोर येत आहे.
संघर्ष दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा र.नं 0809/2025 नुसार भा.न्या.सं (2023) 109,शस्त्र अधिनियम (1959)3,25 अन्वये गुन्ह्यांची नोंद झाली असून आरोपीचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत.



