गुन्हेगारी

घातक शस्त्र बाळगून डिझेल चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद

 

 

 घातक शस्त्र बाळगून डिझेल चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद

 

दिनांक 28 8 2025 रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव व पोलीस हवालदार साखरे पेट्रोलिंग करत असताना मनमाड हायवेवर इसम नामे प्रवीण धनवटे यांनी सुमारे 2.30 वाजताच्या दरम्यान त्यांनी त्यांची गाडी मनमाड हायवे वरील एका हॉटेलवर लावलेली असताना तीन इसमांनी घातक शास्त्रानिशी येऊन त्यांच्या गाडीतील डिझेल चोरी करून दिले अशी माहिती कळवल्या वरून पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव यांनी तात्काळ दिलेल्या माहितीप्रमाणे सदर तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले व त्यांचे नाव गाव विचारले असता

1.करण राजेंद्र साळुंखे राहणार नांदुरकी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 

2.सागर राजेंद्र सातपुते राहणार नांदुरकी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 

3.दीपक राजेंद्र सातपुते राहणार नांदुरकी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे सांगितल्याने व डिझेलचा ड्रम व घातक हत्यार त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन. प्रवीण धनवडे राहणार बारागाव नांदूर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर ठेवले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, व पोलीस लेखनिक इत्तेकार सय्यद करत आहे. 

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  सोमनाथ घर्गे  अप्पर पोलीस अधीक्षक  सोमनाथ वाकचौरे  उपविभागीय पोलीस अधिकारी  जयदत्त भवर  यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस नाईक जालिंदर साखरे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे पोलीस शिपाई अंबादास गीते यांच्या पथकाने केली.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे