ब्रेकिंगमहाराष्ट्र

तिळापुर ग्रामसभेत कामाचा तपशील मागितल्याने  ग्रामसभा गुंडाळली 

तिळापुर ग्रामसभेत कामाचा तपशील मागितल्याने  ग्रामसभा गुंडाळली 

 

तिळापुर ता. राहुरी येथील २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून ग्रामसभेच्या इतिवृत्तात असलेल्या कोणत्याही विषयाची चर्चा न करताच ग्रामसभेतुन ग्रामसेवक सरपंच  काढता पाय घेतल्याने येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

याबाबत चे सविस्तर निवेदन तहसीलदार डॉ प्रदीप पवार यांना देण्यात आले असून या निवेदनावर विविध प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असून यामध्ये गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या ५ वर्षातील कामाचा हिशोब ग्रामसभेत मांडण्यात यावा तसेच स्वच्छ्ता पाणीपुरवठा आणि गटारीचे कामे आदींचा हिशोब माहिती ग्रामस्थांनी मागितली त्याच बरोबर ग्रामसभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषयावर चर्चा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता ग्रामसेवक यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला 

कुठलीही विकासकामांची चर्चा करण्यास ग्रामसभेत झाली नसल्याने याचा व्हिडिओ येथील युवकांनी घेऊन याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याच बरोबर पाच वर्षातील विविध विकास कामे आणि त्या कामाच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून कामाचे बोगस मूल्यांकन करून निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले तसेच या कामात पंचायत समिती बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी संगनमताने बिले काढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात ग्रामपंचायत कमिटी मुदत संपणार असल्याने या अगोदर या कामांची चौकशी करून ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून येत्या चार दिवसात विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांना न्याय द्यावा अन्यथा पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर दीपक येळे, नामदेव चोरमले, अविनाश गरदरे, किरण बाचकर, सचिन खरात आदींच्या सह्या आहेत.

कोट -तहसील गट विकास अधिकारी यांच्याशी विस्तृत चर्चा करून सर्व समस्या सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामसभा घेण्यास सांगतो असे ग्रामस्थांना सांगण्यात आले.

ग्रामसभा व मासिक सभेत सरपंच उपसरपंचाचा सहित किती सदस्य उपस्थित राहत होते. त्यांचे फोटो सहित व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वतः गट विकास अधिकारी यांनी तपासावे. याच वेळेस लक्षात येईल की गावाच्या की स्व विकास साठी चार भिंतीच्या आत ठराव करण्यात आलेले आहेत. कमिटीची मुदत संपत आल्यावर सदस्यांच्या एकाच वेळेस कशा सह्या करून घेण्यात आलेल्या आहेत. ग्रामसभेसाठी सर्व जमाखर्चाचे व ग्रामसभा , मासिक सभेचे, सर्व कॅशबुक , घरपट्टी व पाणीपट्टी केलेल्या सर्व कामाचे टेंडर्स इस्टिमेट व वर्क ऑर्डरसह इतर सर्व दप्तर घेऊन स्वतः गटविकास अधिकारी यांच्या समक्ष ग्रामसभा घेण्यात यावी ही आमची मागणी आहे. – नामदेव चोरमले

 

निकृष्ट दर्जाची कामे करून बिले काढण्यात आलेले असून पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस कामाचे मूल्यांकन केले आहेत त्यामुळे अल्पदरातील निकृष्ट दर्जाचे सामान वापरण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांना अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत कामाचा तपशील द्यावा – दीपक येळे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे