देडगाव परिसरात पावसाची दमदार हजरी.
देडगाव परिसरात पावसाची दमदार हजरी.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका, पाचुंदा, तेलकुडगाव, जेऊर हैबती येथे काल शनिवारी मेघ गर्जने सह पावसाच्या सरी बरसल्या. पहिल्याच पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शेतातील डाळिंब या सारख्या फळबागांना तसेच ऊस पिकाला पावसाची गरज होती. तसेच आंतर मशागत व पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग चालू झाली लहान तरुणांनी पहिल्या पावसात रस्त्यावर भिजण्याचा आनंद लुटला.
वाऱ्याचा वेग कमी असल्याने कोणत्याही प्रकारची पडझड अथवा नुसकान झाले नाही. काही शेतकऱ्यांनी शेतात कपाशी लागवड केली आहे या पिकासाठी पावसाची गरज होती पाऊस आल्याने मात्र वीज गायब झाली. पावसामुळे व वादळामुळे फळबागांना निश्चितच मोठा फटका बसला आहे. सध्याला आंबा फळबागांना याचा चांगलाच मोठा फटका बसून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. आंब्याची फळे मोठ्या प्रमाणावर खाली गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुसकान झाले आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परिसरात पाऊस पडल्याने परिसरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.