मेजर थोरात यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद -अँड बारहाते
मेजर थोरात यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद -अँड बारहाते
बेलापुर (प्रतिनिधी )-आपण ज्या परिस्थितीत शिकलो ती वेळ विद्यार्थ्यांवर येवू नये याची जाण ठेवून मेजर किशोर थोरात यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे गौरोद़्गार बेलापुर खूर्दचे उपसरपंच अँड दिपक बारहाते यांनी काढले मेजर किशोर थोरात यांच्या वतीने बेलापुर खूर्द येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांकरीता शालेय साहित्य भेट देण्यात आले त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई हे होते या वेळी बोलताना मेजर किशोर थोरात म्हणाले की मी याच शाळेत घडलो घरची परिस्थीती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शाळेत कधी पुस्तके नसत तर कधी वह्या नसत त्या ही परिस्थितीत शालेय शिक्षण घेवुन आज देशाची सेवा करण्याचा बहुमान मिळतो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे परिस्थितीमुळे कुणावरही शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येवू नये ही माझी शाळा असुन त्या शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेल असे मेजर थोरात म्हणाले या वेळी पत्रकार देविदास देसाई राजेंद्र कुंकुलोळ पोलीस पाटील युवराज जोशी संजय शेलार दिलीप बडधे संतोष बडधे आनंद बडधे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपणही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भारती दायमा यांनी केले तर प्रियंका शहाणे यांनी आभार मानले