वांगी बुद्रुक ग्रामसभा वादळी ड यादीवरून राडा ग्रामसभा झाली तहकूब
💢
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मधील बऱ्याचशा घरकुल लाभार्थ्यांना यादी मध्ये पक्की घरे असल्याचे दाखवत अपात्र करण्यात आले परंतु जे अपात्र करण्यात आलेले व्यक्ती यांच्या नावे पक्की घरे नसतानाही पक्की घरे आली कशी या विचारात असतानाच अखिल भारतीय मानवाधिकार मिशन पंचायत समिती श्रीरामपूर येथे निवेदन देऊन सर्वे करण्याची मागणी केली त्यातच ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेण्याचे ठरवले व आज रोजी सकाळी ग्रामसभेसाठी नागरिक जमा झाले परंतु ग्रामसभेसाठी फक्त सरपंच उपसरपंच व एक सदस्य उपस्थित झाले होते ग्रामसभा चालू होताच ठकाजी पिसाळ यांनी घरकुल यादी चा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ग्रामसेविका सौ बाचकर यांनी ड यादी पात्र लाभार्थी यांची यादी वाचून दाखवल्या नंतर अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला ग्रामसभेमध्ये सर्वांची बोलती बंद झाली त्यातच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात ग्रामसेवक व सरपंच यांनी स्पष्ट केले की हा सर्वे जुना आहे त्यावेळेस सर्वे कसा झाला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले त्याच वेळेस काही कारणास्तव ग्रामसभा तहकूब करण्यात आली व पुढील ग्रामसभेची तारीख 5 जानेवारी देण्यात आलेली आहे आता ग्रामसभे पुढे दोन प्रश्न आहेत ते म्हणजे पक्के घरे नसताना पक्क्या घराच्या नोंदी कशा लागल्या व ज्यांना आपल्या वॉर्डातून आपल्या कामासाठी निवडून दिले ते ग्रामसभेत उपस्थित न राहून ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडले त्यांच्यावर ग्रामपंचायत काय कारवाई करणार हे लवकरच स्पष्ट होईल
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.