समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवुन द्या – भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
तेली महासंघाचे कामकाज अधिक गतीमान करुन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करा असे अवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता प्रदेश तेली महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवुन सांगितले की समाजाची जणगणना करण्याचे काम प्रगती पथावर असुन कार्यकर्ते घरोघर जावुन समाजाच्या समस्या जाणून घेत आहेत . लवकरच आपल्या उपस्थितीत समाजाचा मेळावा घेणार असल्याचेही प्रदेश तेली महांसघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी सांगितले .या वेळी प्रदेश तेली महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे अहमदनगरचे प्रदेश सेक्रेटरी विजू काळे, नाशिक विभाग कार्याध्यक्ष अरविंद तारुणकर, अहमदनगर युवा अध्यक्ष नितीन फले, ज्येष्ठ समाजसेवक साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते भीमराज महाले, प्रदेश उपाध्यक्ष मनोज संतशे, सेवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कचरू वेळंचकर, देविदास साळुंखे, सुभाष भगत, अभिषेक भगत, बेलापूर प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, तालुकाध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष सागर ढवळे, तालुका सेक्रेटरी संदीप सोनवणे, बेलापूर शहराध्यक्ष योगेश शिंदे, प्रदेश सेवा आघाडी उपाध्यक्ष देविदास कहाने, विभाग सचिव नाशिक कैलास बनसोडे, भागवत लुटे, रवींद्र करपे, चंद्रकांत शेजुळ, हाजी इस्माईल शेख,भाजपचे सरचिटणीस प्रफुल डावरे, पत्रकार किशोर कदम, शफिक बागवान आदी उपस्थित होते.