राष्ट्रीय पोषण आहार माह निमित्त मानोरी शाळेत पोषक आहार स्पर्धा संपन्न

राष्ट्रीय पोषण आहार माह निमित्त मानोरी शाळेत पोषक आहार स्पर्धा संपन्न
राष्ट्रीय पोषण आहार माह निमित्त राहुरी तालुक्यातील मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषक आहार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी घरातील उपलब्ध पालेभाज्या,फळभाज्या, विविध डाळी,कडधान्ये विद्यार्थ्यांनी आणले.यात प्रामुख्याने बटाटा,टोमॅटो,भेंडी,गवार,दोडके,घोसाळे,भोपळा, आळूची पाने,लिंबू,नारळ,सफरचंद,पेरू,केळी,संत्रा,मोसंबी,काकडी,कांदा,लसूण,
पालकभाजी,शेपुभाजी,मेथी,अंबाद्याची भाजी, सिताफळ,चिक्कू,तसेच राजगिरा चिक्की,गावरान तूप,शेंगदाणा,तेल, डाळी व कडधान्ये,लाडू या पदार्थांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर,शालेय पोषण आहार अधीक्षक हेमंत साळुंके, विषयतज्ञ सतीश तांदळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्रजी आढाव, मानोरी गावचे सरपंच अब्बासभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव,सोमनाथ वाघ,हरीभाऊ आढाव,मुख्याध्यापक संजय पाखरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूनम क्षीरसागर, विठाबाई शेटे, ज्योती भोगे, कलावती जासूद आदींनी प्रयत्न केले.