ब्रेकिंगमहाराष्ट्र

टाकळीभान येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस कार्यप्रणाली व कायदे विषयी मार्गदर्शन…

 टाकळीभान येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस कार्यप्रणाली व कायदे विषयी मार्गदर्शन…

 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी .10.00 ते 11:30 या वेळेत पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, व तालुका पोलीस यंत्रणेच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांना पोलीस कार्यप्रणाली, शास्त्रास्र व कायदे विषयी मार्गदर्शन करून सूचना देऊन मार्गदर्शन केले.

 

विद्यालयाच्या वतीने पोलीस यंत्रणाचे स्वागत व आभार मानण्यात आले. याप्रसंगी स. फौजदार हबीब अली,पो. हवालदार अर्जुन बाबर, पो ना. अनिल शेंगाळे, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब पटारे, विद्यालयाचे प्राचार्य बी.टी. इंगळे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे