नेवासा तालुक्यात प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला मारले, अखेर आरोपीला जन्मठेप
प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला तोंड दाबून मारले, अखेर आरोपीला जन्मठेप
नेवासा तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना
, मामा कडे शिक्षणासाठी राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मामा च्या मुलीचा खून केल्याची निर्दयी घटना घडली नेवासा तालुक्यातील मौजे सौंदाळा येथे आरोपी आप्पासाहेब नानासाहेब थोरात हा आय. टी. आय चे शिक्षण घेण्यासाठी मामा कडे आलेला होता. शिक्षण घेत असताना तो मामाच्या घरी रहात होता मामाच्या घराशेजारी राहणा-या नात्यातील एका अल्पवयीन मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले , त्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने तिचे इच्छेविरुध्द तिला प्रेमात पाडुन तिला गुलाबाचे फूल देऊन तिच्या अंगास लगट करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तिच्या घरामागे केले हे करत असताना त्याच्या मामाच्या लहान मुलीने बघितले.
आरोपी घरी आल्यानंतर मामाच्या लहान मुलीने त्याला सांगितले की मी तुझे नाव वडीलांना म्हणजे आरोपीचे मामाला सांगेल. तेव्हा आरोपीचे तथाकथित प्रेमाबाबत मामाला समजले तर मामा आरोपीवर रागावेल, आरोपीला सौंदाळा येथून कायमचे काढून देईल व त्याला अल्पवयीन पिडीत मुलीशी भेटता येणार नाही. म्हणून आरोपीने मामाच्या लहान मुलीचा कायमचा काटा काढून प्रेमातील अडसर दूर करण्याचे ठरविले.
दि.२०/०६/२०२० रोजी साधारणतः साडेनऊच्या
सुमारास घरातील सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले. त्यानंतर आरोपीचा मामा, मामी, मामाचा मुलगा शेतात झोपण्यासाठी गेले. आरोपी आप्पासाहेब हा घरासमोर झोपला. मामाच्या दोन्ही मुली घरामध्ये अभ्यास करुन आतून दरवाज्याची कडी लावून झोपल्या.
रात्री साधरणतः बाराच्या सुमारास आरोपी आप्पासाहेब याने बाहेरुन हात घालून आतून लावलेली कडी उघडून आत आला. कडीचा आवाज ऐकून आरोपीच्या मामाची मोठी मुलगी जागी झाली. आरोपीने मामाच्या लहान मुलीच्या पायथ्याजवळ पडलेली रग उचलून मामाच्या लहान मुलीच्या तोंडावर टाकला. त्यावेळेस शेजारीच जागी झालेली मामाची मोठी मुलगी बोलली की, तू हे काय करतोस. तेव्हा आरोपी आप्पासाहेब म्हणाला की तू शांत बसून रहा. जर ओरडलीस कुणाला
सांगितलेस तर तुलाही असे जीवे ठार मारील अशी
धमकी दिली. आणि आरोपीने मामाच्या लहान मुलीच्या
छातीवर बसुन दोन्ही हाताने रग तिचे तोंडावर जोरात दाबुन धरून तिचा श्वास बंद पाडून तिला ठार मारले.
सकाळी मयताचे आई वडील शेतातून आले. त्यांनी
मुलींना आवाज दिला. मुली बाहेर आल्या नाही तेव्हा मयताच्या वडीलांनी दरवाजा लोटुन आत प्रवेश करुन मुलीस बघितले तेव्हा ती उठत नव्हती त्यावेळी आरोपी आप्पासाहेब तेथे येऊन सांगू लागला की मामा तिला सापबिप चावला असेल. तेव्हा शेजारी नातेवाईक जमा होऊन त्यांनी मयतास ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तिच्या मुत्यूवर संशय व्यक्त करून उत्तर तपासणीसाठी सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे पाठविले. तज्ञ डॉक्टरांनी प्रेताचे शवविच्छेदन करून मयतास कारण छातीवर कशाने तरी दाब टाकुन श्वासोच्छवास बंद पडुन मुत्यू असा अभिप्राय दिला. सिव्हिल हॉस्पिटलच्या अभिप्रायानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हयाचा सखोल तपास तत्कालीन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर केसची सुनावणी नेवासा येथील विशेष न्यायालयासमोर झाली.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे महत्वाचे एकुण नऊ
साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयताची मोठी बहीण, तसेच वैदयकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयापुढे आलेले साक्षीपुरावे तसेच विशेष सरकारी वकील देवा काळे यांनी सरकार पक्षाच्या वतीने
केलेला युक्तीवाद व सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे सादर केलेले महत्वपूर्ण न्यायनिवाडे न्यायालयाने ग्राहय धरून आरोपीस दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपी आप्पासाहेब नानासाहेब थोरात
यास भा.द.वि कलम ३०२ नुसार जन्मठेप तसेच ५०००/- रुपये दंड, व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी तसेच बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, कलम ७ नुसार तसेच भा.द.वि. कलम ३५४ नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व १०००/-
रुपये दंड व दंड न भरल्यास नऊ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी
वकील अँड. देवा काळे यांनी काम पाहिले त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी पो. कॉ. सुभाष हजारे, पो.हे.कॉ राजू काळे, पो. ना. बाळासाहेब बाचकर, म.पो. कॉ. ज्योती नवगिरे, पो.हे.कॉ. जयवंत तोडमल यांनी विशेष सहकार्य केले.