उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली सकारात्मक चर्चा – डॉ. शशिकांत तरंगे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली सकारात्मक चर्चा – डॉ. शशिकांत तरंगे
धनगर समाजाला आदिवासींच्या धरतीवर लागू केलेल्या 23 योजना लागू केल्या व त्याचं बजेटही मंजूर केलं. मेंढपाळांसाठी एक चांगली योजना महाराष्ट्र सरकार चालू करणार आहे. धनगर समाजाचा आरक्षनाचा प्रश्न जानेवारी पर्यंत सोडवणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धनगर ऐक्य परिषदेच्या समन्वयकांना सांगीतले….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धनगर ऐक्य परिषद समन्वयक यांची सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाण धनगर आरक्षण बाबत बैठकीत धनगर आरक्षण बाबतीत महाराष्ट्र सरकारला काही तंत्रीक आडचणी जाणवतात त्या दुरुस्थ करून शिफारस पाठवणार आहे. तसेच जे अदिवाशांना ते धनगरांना या नुसार 23 योजना बाबतीत जानेवारी पर्यंत सर्व योजनांवर फंड देऊन सुरू करणार. मेंढपाळच्या साठी एक मोठी योजना सरकार आणत आहे . तसेच महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव यांचा वाडा रयत शिक्षण संस्थेने सोडण्यासाठी सरकार रयत शिक्षण संस्थेला पत्र पाठवणार आणी महाराजा यशवंतराव होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक बनवणार,तसेच जालना जिल्ह्य़ातील धनगर समाज बांधवांवर पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या चुकीच्या मारहाणी मुळे त्यांचे निलंबन करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डॉ शशिकांत तरंगे साहेब यांच्या नेतृत्वाखालील धनगर ऐक्य परिषदेच्या शिष्टमंडळ यांच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज बांधव यांनी जाहीर केले. त्यामुळे डॉ शशिकांत तरंगे साहेब यांनी पुकारलेले आंदोलन तात्पुरते मागे घेतले असल्याची घोषित केले..
शशिकांत तरंगे
Gopichand Padalkar – गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar
Devendra Fadnavis
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे