श्रीरामपुर कराच्या प्रेमाची उतराई कामातुन करणार -आमदार लहु कानडे

श्रीरामपुर कराच्या प्रेमाची उतराई कामातुन करणार -आमदार लहु कानडे
श्रीरामपुरकरांनी मला भरभरुन प्रेम दिल्यामुळे त्या प्रेमाची उतराई कामाच्या माध्यमातून करणे हे माझे कर्तव्य असुन सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्यिकरीता मी सदैव बांधील आहे असे उद़्गार आमदार लहु कानडे यांनी काढले आमदार लहु कानडे यांच्या विकास निधीतुन रेव्हेन्यू हौसींग सोसायटी श्रीरामपुर या ठिकाणी ओपन जिमचे साहीत्य देण्यात आले त्या वेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की मी सर्व प्रथम या सोसायटीचाच रहीवासी होतो .
त्यामुळे येथील समस्यांची मला जाण असुन त्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे असेही आ. कानडे म्हणाले या वेळी बोलताना अँड बाळासाहेब देशमुख म्हणाले की आमदार कानडे हे या सोसायटीचे जुने रहीवासी आहेत यापूर्वीही आमदार कानडे यांनी या भागातील अनेक समस्या सोडविल्या पुढील काळातही असेच सहाकार्य लाभो असा आशावाद अँड देशमुख यांनी व्यक्त केला सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर आरोटे म्हणाले की आमदार कानडे यांनी या सोसायटीस ओपन जिम देवुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेतली तसेच अंतर्गत रस्ते अंत्यत खराब झाले आसुन ते दुरुस्त करावेत अशी मागणी केली.
या वेळी माजी नगर सेवक अशोक कानडे नगरसेवक प्रकाश ढोकणे सोसायाटीचे व्हा चेअरमन राजेंद्र त्रीभुवन एस एस नाईक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक अरुण धर्माधिकारी रिजवान शेख इम्रान पठाण प्रविण पंडीत श्रीमती शकुंतला देशमुख प्रकाश वराडे शिवाजी गोसावी एस आर नवले छबुराव शिंदे बख्तियार खान आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड बाळासाहेब देशमुख यांनी केले तर सूत्रसंचलन रज्जाक पठाण यांनी केले