महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना आरपीआय युतीचे सरकार आल्याने बेलापूरात भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला
महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना आरपीआय युतीचे सरकार आल्याने बेलापूरात भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला
गेला १० दिवसा पासुन चालू असलेले राजकीय नाट्य आता संपले असुन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले व श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी व श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे याचा आनंदी जल्लोष बेलापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन फटांक्याची आतिषबाजी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटुन आनंद साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणां या वेळी देण्यात आल्या यावेळी जेष्ठ कार्यकर्ते श्री रामनाथ शिंदे तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, तालुका उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम भराटे, शहर सरचिटणीस श्री राकेश कुंभकर्ण, सागर ढवळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ओबीसी सेल चे श्री रत्नेश गुलदगड, किशोर खरोटे, दतात्रय मुसमाडे, प्रशांत ढवळे, भुषण चंगेडीया, विशाल मेहेत्रे, योगेश सोनवणे, प्रशांत खरोटे, अशोक मुंडलिक, देवरे टेलर, किशोर वैद्य, लखन बडे, अजय थिगळे, करण गोसावी, भुपेंद्र खरोटे, आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते