भोकरला अँड सुभाष चौधरी यांचा सन्मान

भोकरला अँड सुभाष चौधरी यांचा सन्मान
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व अँड सुभाष चौधरी यांची अशोक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल जागृत देवस्थान रेणुका माता मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार, सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकचे माजी व्हा,चेअरमन माणिकराव शिंदे होते. ज्येष्ठ अण्णासाहेब चौधरी, भागवतराव पटारे, अशोकचे विद्यमान चेअरमन पुंजाहरी शिंदे, बाळासाहेब विधाटे, कारभारी तागड, दत्तात्रय पटारे, गणेश छल्लारे, सागर शिंदे, महेश पटारे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड चौधरी यांनी सांगितले की १९८४ सालापासून अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व समवेत अतिशय प्रामाणिक तसेच संघटनेची एकनिष्ठ राहुल काम केल्यामुळे व भोकर गावच्या नागरिकांच्या खंबीर साथीमुळे तसेच सर्वांच्या योगदानामुळे अशोक बँकेच्या चेअरमन पदी बिनविरोध वर्णी लागल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ,भागवत पटारे, महेश पटारे गणेश छल्लारे, सतीश शेळके, पञकार हरीभाऊ बिडवे, चंद्रकांत झुरंगे , आण्णासाहेब वाकडे, बाबासाहेब साळवे,पुंजाहरी शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अण्णासाहेब वाकडे, भाऊराव सुडके, सुरेश अमोलिक, राजेंद्र तागड, राहुल अभंग, उत्तम शिंदे,दिपक पटारे,पंढरीनाथ मते, आण्बाणासाहेब काळे, बाबासाहेब बेरड सुनील वाकडे, सतीश शेळके, राजेंद्र चौधरी, नानासाहेब तागड, अण्णा शेळके, रमेश चौधरी, संजय पटारे, कैलास चव्हाण, रमेश भालके, भारत छल्लारे, याकोब अमोलीक,ऋषी झिने, सुदाम पटारे, धमाजी तागड, यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच महेश पटारे यांनी तर आभार गणेश छल्लारे यांनी मानले