अशोक नगर फाट्यावर भीषण अपघात – एक जखमी तर एकाचा मृत्यु – नागरीकांनी केली गतिरोधकाची मागणी

अशोक नगर फाट्यावर भीषण अपघात – एक जखमी तर एकाचा मृत्यु – नागरीकांनी केली गतिरोधकाची मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा येथे दुपारी चार वाजता समोरसमोर दुचाकी स्वारांचा अपघात झाला एम एच १७ बि आर ९७ २५ बजाज कंपनीची मोटार सायकल असुन दुसरे वाहन हिरो होन्डा कंपनीची स्ट्रिट के फोर या वाहनाला नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले आहे यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत यावेळी टाकळीभान येथील दोघे तर मातापुर निपाणी वडगाव शिवारातील येथील मयत झालेले इसम दौड असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे
यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मदत कार्य करत घटनेची माहिती शहर पोलीस ठाणे यांना कळविली तसेच १०८ क्रमांक रुग्णवाहिका यांना कळविली यावेळी जखमी रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले
यावेळी वैद्यकीय सूत्रांकडून एक रुग्ण गंभीर जखमी असल्याने लोणी पि एम टी येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले सदरच्या रुग्णाची गंभीर परिस्थिती असल्याने लोणी येथून पुणे येथे उपचारासाठी तयारी सुरु असतानाच वैद्यकीय सूत्राकडून दौड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली यावेळी दुचाकी स्वारांचा समोरासमोर अपघात झाला असल्याने जोराचा आवाज झाला काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता वारंवार याच ठिकाणी अपघात होत असल्याने गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत