मानोरी येथील रेणुका माता पायी दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान

मानोरी येथील रेणुका माता पायी दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान
श्रीक्षेत्र मानोरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान उद्या सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे ह भ प सच्चिदानंद वैकुंठवासी श्रीपाद महाराज घोटी व ह भ प सचितानंद वैकुंठवासी रामदास बाबा बुधवारी घोटी यांच्या प्रेरणेने व तसेच ह भ प लक्ष्मण महाराज चौगुले व ह भ प सीमाताई महाराज चौगुले मानोरी यांचे अधिपत्याखाली पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व साधक बंधू आणि भगिनी तसेच भाविक भक्तांनी या दिंडी सोहळ्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी विनंती रेणुका माता पायी दिंडी सोहळा या कमिटीने केलेली आहे.
या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिंडी सोहळ्यात नित्यनेमाने हरिपाठ काकडा भजन प्रवचन हरिकीर्तन नामस्मरण हे कार्यक्रम नियमित होणार आहे पंढरपूर त्रिलोक तीर्थ शेगाव दुमाला गणेश ढाब्याशेजारी पंढरपूर येथे ह भ प लक्ष्मण महाराज चौगुले यांचा काल्याच्या कीर्तनाने दिंडी सोहळ्याची सांगता होईल तरी परिसरातील भाविक भक्तांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आव्हान रेणुका माता पायी दिंडी सोहळा यांनी केले आहे