ब्रेकिंग

खंडित असलेल्या चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार

दोन वर्षांपूर्वी कोरणा महामरिमुळे खंडित असलेल्या चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार

 

 

दोन वर्षांपूर्वी कोरणा महामरिमुळे खंडित असलेल्या चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार.

 मांजरी पानेगाव चे गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला सुरू होतो आणि तीन दिवस चालू असतो.

   यात्रेच्या दिवशी पहाटे गंगा नदीवरून आणलेल्या कावडीने नवयुवक जलाभिषेक करतात जलाभिषेक पहिला मान गावातील तेली समाजालाअसून आंबील आरतीचा मान पानेगाव चे जंगले यांना आहे पूर्वीची आख्यायिका अशी आहे की मुळा नदीच्या काठावर चंद्रगिरी महाराज भक्ताच्या स्वप्नात जाऊन बोलले की मी नदीच्या काठावर आहे मला मामा भाषांची बैलजोडीत मला इथून घेऊन जा.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेला चंद्रगिरी महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मांजरी याठिकाणी करण्यात आला त्यानंतर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो.

  यात्रेच्या दिवशी या ठिकाणी जिल्ह्यातून तसेच अनेक ठिकाणाहून नवसपूर्तीसाठी भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसते नवसपूर्तीसाठी येथे शेरणी गुळाची वाटप केली जात असते. यात्रेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी रथा वरून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीच्या वेळेस पानेगाव मांजरी या दोन्ही गावच्या बाजूने मुळा नदी तटावर फटाक्यांची आतषबाजी पाहावयास मिळते आतशबजी पाहण्यासाठी येथील परिसरातील लाखो भाविक येथे जमा होत असतात.

  यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा तसेच बैलगाड्यांच्या शर्यती येथे साजरी करण्यात येतात कुस्त्यांच्या हागाम्या साठी जिल्ह्यातून तसेच राज्यातून नामवंत मल्ल येथे येत असतात. तसेच बैलगाड्यांच्या शर्यती साठी हे राज्यातून टांगेवाली येत असतात.

तिसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीच्या शेवटच्या दिवशी महिला यांची खरेदीसाठी भावी गर्दी झालेली असते यावेळी पोलिस तसेच गावातील यात्रा कमिटीकडून महिलांना तसेच इतरांना कुणाला त्रास होऊ नये म्हणू सुरक्षेची काळजी घेतली जाते

   

मांजरी पानेगाव या दोन्ही गावांमध्ये कुठल्याही प्रकारे छत्री तसेच दुमजली इमारत तसेच पलंग गाधीचा वापर केला जात नाही यागोष्टी चंद्रगिरी महाराजांना चालत नाही श्रद्धेपोटी गावांमध्ये वरील गोष्टींचा वापर केला जात नाही.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे