राजकिय
दिव्यांगाच्या विविध समस्यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर स्वतंत्र बैठकीचे आयोजन

दिव्यांगाच्या विविध समस्यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर स्वतंत्र बैठकीचे आयोजन
करण्यात येईल,उपेक्षित,दूर्लक्षित,दिव्यांग घटकांसाठी कार्य करणे नक्कीच कौतूकास्पद आहे.महात्मा ज्योतिबा फूले यांनी आयूष्यात पूण्यात नगरसेवक म्हणून कार्य केले.त्यांची कन्सट्रक्शन कंपनी होती नगरजवळील पूलाचे काम त्यांनी केलेले आहे हे अनेकांना ज्ञात नाही.समाजकंटकापासून संरक्षणाकरिता लहूजी वस्ताद व तालमीतील पहिलवानांचे सहकार्य घ्यावे लागले.समाजप्रबोधनापेक्षा सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावयाचा असेल तर कायदा करणे क्रमप्राप्त आहे त्यामूळे बाबासाहेबांनी कायदा तयार केला संविधानाची निर्मिती केली.आम्ही विधानसभा सदस्य कायदा तयार करतो परंतू त्यास मा. सर्वौच्च न्यायालयाची संमती असणे गरजेचे आहे अशी तरतूद बाबासाहेबांनी केली.आज जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेच्या निमित्ताने बाबासाहेब आणि फूले नवीन पिढीला नक्कीच समजतील त्यामूळे संयोजकांनी विचारांची पेरणी केली असेच म्हणावे लागेल.लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तूमचे हक्काचे,न्यायाचे आहे ते मिळवून देतो ते आमचे कर्तव्य आहे आणि तो तूमचा हक्क आहे.दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमाचे लवकरच नियोजन करण्यात येईल असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व दिव्यांगाना जिवनावश्यक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आ.लहूजी कानडे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फूले व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयूक्त जयंती निमित्त सहर्षा हाॅल बोंबलेपाटीलनगर यांठिकाणी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व दिव्यांगाना जिवनावश्यक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे उदघाटन नामवंत विधिज्ञ अॅड.तूषार चौदंते यांच्या शूभहस्ते तूलशीवृंदावनाला पाणी अर्पण करुन करण्यात आले.कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शशांक रासकर,सहाय्यक केंद्र प्रमूख राजाबाई कांबळे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड,आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी,महिला प्रदेशाध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी,भारत मूक्ती मोर्चाचे एस.के.बागूल यांची प्रमूख उपस्थिती होती
बाबासाहेब महात्मा फूलेंना आपले गूरू मानत त्यामूळेच गूरूंच्या आदरांप्रती बाबासाहेबांनी संविधानाचे शेवटचे कलम महात्मा फूले यांच्या घराला नगरपालिकेने दिलेल्या क्रमांकाचे लिहिले व गूरूप्रती आदर व्यक्त केले.आजच्या स्पर्धेकांनी समाजसूधारकांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.असे विचार कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रसिध्द विधीज्ञ अॅड.तूषार चौदंते यांनी केले.
स्पर्धेत शालेय गटात प्रथम क्रमांक गायत्री बढे (संगमनेर),व्दितीय क्रमांक वैष्णवी दौंड,तृतीय क्रमांक मयूर भारस्कर,उत्तेजनार्थ सार्थक पूजारी,महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक प्रतिक जाधव,व्दितीय क्रमांक तेजस्विनी शिनगारे,तृतीय क्रमांक प्रज्ञा जाधव उत्तेजनार्थ ओवी गूंजाळ व खूशी कूलकर्णी यांनी पारितोषिके पटकावली.
याप्रसंगी दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात संजय साळवे यांनी दिव्यांगाच्या विविध समस्यांचे परिमार्जन केले.परिक्षक म्हणून सहाय्यक केंद्रप्रमूख राजाबाई कांबळे व अध्यापक शाकिर शेख यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूश्ताकभाई तांबोळी यांनी केले तर आभार आसान दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास काळे यांनी मानले.
Rate this post