परम पूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ यांची पुण्यात सकारात्मक बैठक संपन्न.

परम पूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ यांची पुण्यात सकारात्मक बैठक संपन्न.
विकासापासून दूर कोसो असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, भराडीजोगी, मरीआईवाले, स्मशान जोगी, बहुरूपी, गारपारधी, वासुदेव, बाळ संतोषी, किंगरीवाले, समाजासाठी आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित असलेल्या समाजासाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महायुती सरकारने समस्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने शनिवार, दिनांक 31 मे 2025 रोजी, पत्रकार भवन, नवी पेठ,पुणे या ठिकाणी वरील नमूद समस्त समाजाच्या वतीने महायुती सरकारचे जाहीर आभार मानले गेले,
सदर मीटिंगची सुरुवात समस्त समाजाचे दैवत असलेले श्रीनाथ बाबा यांची आरती व परमपूज्य गंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पारंपारिक वाद्य वाजवून आरती करण्यात आली. तसेच उपस्थित प्रमुख नेते कार्यकर्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सदर मिटींगला महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रामुख्याने आमदार योगेशजी टिळेकर साहेब उपस्थित राहिले, व उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी शासनाचा संपूर्ण जी.आ. आर ची माहिती सविस्तरपणे समस्त उपस्थित समाज बांधवांना सांगितली. व आश्वासित केले की सदर महामंडळाला जास्तीत जास्त निधी तसा उपलब्ध होईल यासाठी लवकरच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ यांना भेटून ५० कोटीच्या एवजी 250 कोटी कसा मिळेल यावर जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना सांगितले. व समस्त समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेले परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ यांच्या सोबत महायुती सरकार प्रचंड ताकतीने उभा राहील असा विश्वास दिला.
तसेच उपस्थित समाज बांधवांना युवा नेते विजय जाधव यांनी परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत, त्यामध्ये कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत तसेच त्या योजनांचा फायदा समाजातील तरुण बेरोजगार यांना कसा होईल याबाबत सविस्तर माहिती उपस्थित समाज बांधवांना दिली.
तसेच यावेळी समाजातील ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्री बाबुरावजी सर यांनी समस्त समाजाला आव्हान केले की स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्या आयुष्यामध्ये परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या रूपाने विकासाचा सूर्य उगवलेला आहे, या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध उपलब्ध होणार आहेत त्यामुळे समाजातील बेरोजगारी कमी करण्यामध्ये या महामंडळाचा खूप फायदा आपल्याला होणार आहे. त्यामुळे समाजातील जास्तीत जास्त बेरोजगार करून तरुणींनी लवकरच आपली कागदपत्रे तयार करून ठेवावी म्हणजे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये महामंडळ चालू झाल्यानंतर आपल्याला लगेचच प्रस्ताव दाखल करता येईल.
तसेच यावेळी पत्रकार विकास जगताप यांनी उपस्थित समाज बांधव व माननीय आमदार साहेब यांना संबोधित करताना म्हणाले की, परमपूज्य गंगानाथ आर्थिक विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेताना आम्हाला काही अडचणी येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय जामीन अट खूप जाचक असून ती शिथिल करण्यात यावी कारण भिक्षा मागून जगणारा समाज पोटाची खडकी भरण्यासाठी गावे गावी भटकंती करत असतो त्यामुळे यांना शासकीय जामीन मिळणार नाही त्या अनुषंगाने शासनाने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर अट शितल करून खाजगी जामीन घ्यावे, तसेच शहरी भागातील तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यामध्ये प्रमुख अडचण अशी आहे की, उत्पन्नाची मर्यादा शासनाने एक लाखापर्यंत ठेवलेली आहे तीही शिथिल करून पाच लाखांपर्यंत करावी. कारण शहरी भागामध्ये एक लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी.अशी विनंती यावेळी पत्रकार विकास जगताप यांनी केली.
त्यानंतर अनेक मान्यवरांनी उपस्थित समाज बांधवांना सामाजिक एकता, विकास, विद्यार्थ्यांचे शिक्षण अशा अनेक विकासात्मक महत्त्वाचे मुद्द्यावर भाषणे केली.
त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवनाथ जी शिंदे साहेब यांचे भाषण सुरू झाले . उपस्थित समाज बांधवांना प्रबोधन / मार्गदर्शक करताना साहेबांनी अनेक विकासात्मक गोष्टींवर प्रकाश टाकला. ऐतिहासिक दाखले देत आपला समस्त समाज किती महान आहे हे समाज बांधवांना पटवून सांगितले. तसेच परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारे कसे कसे आणि काय प्रयत्न केले आणि आपल्याला कोणी कोणी कशाप्रकारे सहकार्य केले याविषयी सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित बंधू आणि भगिनींसह समस्त महाराष्ट्रातील सर्व स्वरातील समाज बांधवांना दिली. यावेळी प्रामुख्याने साहेब म्हणाले की, माझ्या समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा उच्चशिक्षित झाला पाहिजे माझ्या समाजातील प्रत्येक बंधू आणि भगिनींचे राहणीमान आणि जीवन उंचावण्यासाठी आम्ही सदर महामंडळ शासनाकडे अनेक प्रयत्न करून मंजूर करून आणलेले आहे, यावेळी प्रामुख्याने शिंदे साहेब म्हणाले की सदर महामंडळ स्थापनेसाठी कोणाची साथ मिळाली असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे साहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब, व समस्त कॅबिनेट यांचा खूप मोठा आधार आणि साथ मिळाली,
शेवटी विकासात्मक चर्चा करत समस्त समाजाला शिंदे साहेबांनी आवाहन केले की समाजातील जास्तीत जास्त लोकांनी परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी स्वाभिमानी व निर्देशनी आयुष्य जगावर व एक आदर्श समाज म्हणून जगासमोर उभे राहावे.
काही स्तरातून महामंडळाच्या नावावर होत असलेल्या विरोधावर प्रश्न विचारल्यानंतर शिंदे साहेब यांनी कोणतेही उत्तर न देता फक्त स्मित हास्य दिलं.
सदर प्रसंगी, समाजातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुदाम शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक बाबुराव सुरूपे, सह शेकडो बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
सदर परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले यावर समस्त समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
सदर सामाजिक कार्यक्रम लोकप्रिय युवा नेते भटक्या विमुक्तांचा बुलंद आवाज समजले जाणारे माननीय श्री विजय जी जाधव अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार मोहन शेगर, काशिनाथ चौगुले, उत्तमराव सावंत, विठ्ठल शेगर, आणि सहकारी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवनाथ शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली…
गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाची जनजागृती प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहे