ब्रेकिंगमहाराष्ट्र

वांगी खुर्द येथील आदिवासी मोरे वस्ती येथे विशेष मोहीम राबविण्यात आली – तहसीलदार वाघ.

वांगी खुर्द येथील आदिवासी मोरे वस्ती येथे विशेष मोहीम राबविण्यात आली – तहसीलदार वाघ.

 

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथे उपसरपंच सचिन राऊत व ग्रामसेवक  तगारे यांच्या संकल्पनेतून आदिवासी मोरे वस्ती येथे गोरगरीब कष्टकरी नागरिकांसाठी नवीन मतदार नाव नोंदणी, घरकुल लाभ ,नवीन रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड ,संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच ग्रामस्थांना घरकुल बांधण्यासाठी वाळू व इतर महसुली कामे एकाच जागेवर सेवा उपलब्ध करून देण्यात यशस्वी नियोजन करण्यात आले .

राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आल्याने गावातील समस्या गावातच सोडवता येतात याचेही नक्कीच उदाहरण डोळ्यासमोर येईल.

 

वांगी खुर्द गावामध्ये वरील कामांचे एकाच ठिकाणी निवारण झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत व तहसीलदार यांचे आभार मानले प्रत्येक ग्रामपंचायतने या प्रकारे नवनवीन अभियान राबवून नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडवण्यास नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतात हे या अभियानातून सिद्ध होते .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपसरपंच सचिन राऊत ग्रामपंचायत सदस्य सुभाष मोरे ग्रामसेवक राजेश तगरे यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी मंडल अधिकारी शिंदे मॅडम, तलाठी अशोक चितळकर ,सुरेंद्र पवार, ज्ञानेश्वर गायकवाड ,अक्षय जोशी, दिलीप रणनवरे, जयश्री हलगुटे ,सुरेश मोरे ,शिवाजी मोरे, रावसाहेब जगताप, रवींद्र जगताप ,अर्जुन जगताप ,संजय कोपनर, गणेश  येळे,  साळोबा मेकडे ,अण्णा शेंडगे, विजय पवार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे