राहुरी तालुक्यात पुन्हा गोळीबार माजी नगरसेविकेच्या हातावर गोळी लागून जखमी
राहुरी तालुक्यात पुन्हा गोळीबार माजी नगरसेविकेच्या हातावर गोळी लागून जखमी
राहुरी शहरातील आदीवासी समाजाच्या वस्तीत मागिल भांडणाच्या कारणातून चालू असलेली भांडणे सोडविण्यासाठी माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे गेल्या असता त्यांच्यावर अंकुश नामदेव पवार याने घरात घुसुन गावठी कट्ट्यातून गोळीबार केला बर्डे यांच्या हातावर गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.गोळीबार प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला.तर आदीवासी वस्तीतून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे ताब्यात घेतली आहेत.
राहुरी शहरातील प्रगती विद्यालयाच्या पाठीमागिल बाजुस असलेल्या आदीवासी समाजाच्या वस्तीत माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांचे पती करण माळी व अंकुश पवार यांच्या पुर्व वैमनस्यातुन भांडणे चालू होती. हि भांडणे सोडविण्यासाठी माजी नगरसेविका सोनाली बर्डे या व त्यांचा पप्पू गुलाब बर्डे हे गेले होते. भांडणे मिटवून घरात आल्या असता अंकुश पवार हा गावठीकट्टा घेवून बर्डे यांच्या घरात शिरला करण माळी यांच्यावर गोळीबार करत असताना सोनाली मध्ये आल्याने तीच्या हातावर गोळी लागली.तीला औषधोपचारसाठी नगर येथे हलविण्यात आले.हाताला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.सोनाली बर्डे हि महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांच्या कन्या तर राहुरी नगर पालिकेच्या आताच्या माजी नगरसेविका आहेत. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात घुसुन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
गोळीबार करणाऱ्या अंकुश नामदेव पवार याने सोनाली यांच्या पती करण माळी याच्यावर निशाणा लावला होता. मात्र गोळी सोनाली यांना लागली. गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. ती त्यांच्या हाताला लागली आहे. त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील यांच्यासह फौजफाटाघेवून दाखल झाले.घटनास्थळावरील गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. घटनास्थळावर गावठी कट्ट्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही. परंतू अंकुश पवार याच्या घराची झडती घेतली त्यावेळी गावठी कट्टे बनविण्याचे साहित्य व काही प्रमाणात हत्यारे पोलिसांच्या हाथी लागले आहे.गोळीबार व हत्यारे सापडल्या बाबत स्वंतञ दोन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. गोळीबार प्रकरणी राहुरी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या मध्ये अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार,सुरेश नामदेव पवार, नामदेव पवार (सर्व रा. राहुरी सरकारी दवाखान्या जवळ)आदींचा समावेश आहे.
माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांचे पती करण माळी यांच्या फिर्यादीवरुन सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके आदींनी भेट देवून पाहणी केली व तपाच्या सुचना केल्या.पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
तालुका गुन्हेगारी मुक्त करणार
राहुरी तालुक्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी माझी कारवाई सुरु करणार आहे. या कारवाईतुन दोन महिन्यात तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी वाटेल ते कायद्या नुसार करण्यात येईल तालुका गुन्हेगारी मुक्त करुन दाखविला जाईल. गुन्हेगारी मोडीत काढताना कोणत्या हि राजकीय अथवा सामाजिक संघटनांनी हस्तक्षेप करु नये.तसा प्रकार झाल्यास त्या राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येईल.असे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.