महाराष्ट्र
घोगरगाव विज प्रश्न लवकर मार्गी लावू -निकम
घोगरगाव विज प्रश्न लवकर मार्गी लावू -निकम
नेवासा तालुक्यातील घोगरगाव मधील, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित विज प्रश्न लवकरच मार्गी लावू ,उपअभियंता वैभव निकम,
गेल्या अनेक दिवसांपासून घोगरगाव मध्ये विविध विज प्रश्नांसंदर्भात ,अनेक समस्या ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते , गावचे सरपंच पती सदाशिव बहिरट ,यांच्या पुढाकाराने व उपसरपंच पती नरहरी शिरसाट ,दादासाहेब पठारे, श्रीकांत सिन्नरकर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर उप केंद्राचे सहाय्यक अभियंता वैभव निकम ,यांच्याशी मीटिंग घेऊन , गावच्या विविध विज प्रश्नासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली ,त्यामध्ये नवीन डीपी स्कीम, सिंगल फेज , पूर्ण दावा वीज पुरवठा करणे मागासवर्गीय लोकांचे घर कनेक्शन संदर्भात चर्चा करण्यात आली ,उपअभियंता निकम ,यांनी हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले