सागर बेग यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, युवा वर्गातून मोठ्या प्रमाणावर मागणी
सागर बेग यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, युवा वर्गातून मोठ्या प्रमाणावर मागणी
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच वाल्मिकी समाजाचे मोठे नेतृत्व सागर बेग यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी युवा वर्गातून मोठ्या प्रमाणावर पुढे येवू लागली आहे.
सागर बेग हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसेच हिंदू धर्म रक्षणार्थ त्यांनी काम केले आहे. राज्यात केवळ अहिल्यानगर, नाशिक, सांगली, सातारा, अमरावती यासह विविध जिल्ह्यात लव्ह जिहाद विरुध्द आवाज उठविण्याचे कार्य करत त्यांनी आतापर्यंत राज्यात 58 मोर्चे काढून लव्ह जिहाद विरुध्द आवाज उठविला आहे. असे कार्य करत असताना त्यांचे विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्याची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य जोमाने सुरू ठेवले आहे. आजही गोर गरीब जनतेला मदत करण्याचे काम करत असतात. आजही त्यांच्या कार्यालयात अनेक लोक विविध अडचणी, समस्या घेवून येत असतात आणि सागर बेग हे कोणालाही निराश न करता सर्वांना न्याय देण्याचे काम करून सर्वांच्या समस्यांचे निराकरण करत असतात. मध्यंतरीच्या काळात श्री क्षेत्र सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात मोर्चे काढून त्या ना अटक करण्याची मागणी केली जात होती त्यावेळीही त्यांनी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ उभे राहून मोर्चा काढला होता. हिंदू धर्माचे साधू संत यांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्यांचा आवाज ठेच बंद करण्याचे काम सागर बेग यांनी केले.
असे हिंदू धर्माचे रक्षण करणारे व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे सागर बेग यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी मतदार संघातील युवा वर्गातून केली जात आहे. त्यांच्या मागे आज युवा वर्गाची ताकद असून हीच ताकद त्यांना आमदार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत उतरावे असेही आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत राखीव मतदार संघ झाल्यापासून सर्वच समाजाला संधी देण्यात आली मात्र वाल्मिकी समाजाला न्याय मिळालेला नाही. तरी या समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून ब हिंदू धर्माचे रक्षक म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.