महाराष्ट्रीयन संस्कृती देशात सर्वश्रेष्ठ… जीवन बेनिवाल( प्रशिक्षणार्थी ,पोलीस अधीक्षक)
महाराष्ट्रीयन संस्कृती देशात सर्वश्रेष्ठ… जीवन बेनिवाल( प्रशिक्षणार्थी ,पोलीस अधीक्षक)
टाकळीभान:महाराष्ट्रीयन संस्कृती ही देशात सर्वश्रेष्ठ असून तिचे देशात आदरपूर्वक नाव घेतले जाते.त्याप्रमाणे येथील माणसांचा प्रत्यय प्रशिक्षण कालावधी मध्ये आला असून ते सत्य असल्याची जाणीव झाली असल्याचे उदगार श्रीरामपूर येथे तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित जीवन बेनिवाल (प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी) यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे होते. तसेच पोलीस उपअधीक्षक बसवंत शिवपुजे,श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, शहरचे पोलीस निरीक्षक देशमुख, राहुरीचे पोलीस निरीक्षक ठेंगे, पीएसआय शिंदे ,पीएसआय निकम, शहर पोलीस स्टेशनचे मुंतोंडे आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी जीवन बेनिवाल म्हणाले की काम करत असताना सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पदाचा कोणताही अहंभाव न दाखवता कामास सहकार्य केले. येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील वागण्यातील स्पष्टपणा, जबाबदारी घेऊन काम पूर्ण करण्याचे कौशल्य, कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळे भारावलो असून येथील सर्व टीमचे त्यांनी कौतुक केले. व अतिशय चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला असून येथील आठवणी नेहमीच सोबत राहतील असे ते म्हणाले.
यावेळी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी ते म्हणाले की बेनिवाल साहेबांच्या उत्कृष्ट बंदोबस्तचे नियोजन व मार्गदर्शनाखाली लोकसभेचे मतदान शांततेतरित्या पार पडले. तसेच साहेब प्रशिक्षणार्थी असताना विविध सण उत्सव शिवजयंती, आंबेडकर जयंती, रमजान ईद, यात्रा उत्सव यामुळे साहेबांचा जनसामान्यांशी संबंध आला. तसेच वाळू माफिया, अवैध धंदे, अट्टल गुन्हेगार विरुद्ध साहेबांनी घेतलेली भूमिका व केलेली धाडसी कामगिरी यामुळे साहेबांचे नाव उत्कृष्ट व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून अधोरेखित झाले. साहेबांनी सर्वांना आदरपूर्वक वागणूक दिली असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून शांततेत व त्यांच्या कौशल्याने उत्कृष्ट काम करून घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत काम करायची संधी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस उपअधीक्षक बसवंत शिवपुजे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, पीएसआय निकम, सहायक फौजदार सतीश गोरे ,पो. हे. बर्डे,काळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सर्वांनी जीवन बेनिवाल यांच्या कार्याची पद्धत, कामगिरी याची प्रशंसा करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पो. हे. प्रशांत रणनवरे, पो. हे. बाबर,पो.गाडेकर,बाबा सय्यद,आदींसह श्रीरामपूर शहर ग्रामीण, राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मानले. तर सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन राऊत यांनी केले.