सकल ख्रिश्चन समजाचा श्रीरामपूर मध्ये मूक मोर्चा
सकल ख्रिश्चन समजाचा श्रीरामपूर मध्ये मूक मोर्चा
काँग्रेस,राष्ट्रवादी,वंचित सह रीपाईचा पाठिंबा
टाकळीभान प्रतिनिधी– देशासह राज्यात ख्रिश्चन धर्मगुरू,चर्चवर हल्ले करून धर्मांतराचे खोठे गुन्हे दाखल केले जात असल्याचे निषधार्थ श्रीरामपूर शहरात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने शांतातापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली.यावेळी मोर्चाच्या सुरुवातीस असलेली संविधानची प्रतिकृती लक्षवेधून घेत होती.
शहरातील मुख्य रस्ता , छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहचला .अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत निघालेल्या मोर्चाचे नागरिकांनी कौतुक केले. मोर्चाचे नेतृत्व सर्व पंथीय धर्मगुरूंनी केले.श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील ख्रिस्ती भाविक हजरोच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.प्रांताधिकारी अनिल पवार यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.कमलाकर पंडित यांनी निवेदनाचे वाचन केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक,माजी उप नगराध्यक्ष करण ससाणे,सचिन गुजर,वंचित आघाडीचे चरण त्रिभुवन ,रिपाईचे भीमा बागुल,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस दीपक साठे,अकबर अली,लकी सेठी यांनी यावेळी पाठिंबा जाहीर केला. फा.जो गायकवाड, पाष्टर फेलोशिपचे अध्यक्ष राजेश कर्डक,पा.रावसाहेब त्रिभुवन,पा.दीपक थोरात,पा.पिटर बनकर,बिशप अविनाश सोनवणे, फा. डॉमनिक रोझारियो , फा.मायकल वाघमारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.यावेळी रिजन सोसायटी पुणे चे प्रशांत केदारी एड.श्रीमती कदम,.राजू थोरात, ख्रिस्चन अल्प संख्याकचे अनिल भोसले,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वैभव पंडित व दीपक कदम यांच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मोर्चा संपल्यानंतर प्रांत कार्यालय परिसर कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला.यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मोर्चा यशस्वी करण्याकरिता सर्व चर्चेने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.