अवैध वाळू उपशाने घेतले आणखी चार चिमुकल्यांचा बळी ; वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा अंत
अवैध वाळू उपशाने घेतले आणखी चार चिमुकल्यांचा बळी ; वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा अंत
गेवराई तालुक्यातील दुर्देवी घटना ; घटनास्थळी हजारोंचा जमाव, ठोस कारवाईशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा
वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून सध्या सिंदफना नदी पात्रात हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. घटनास्थळी नागरिक आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी येऊन वाळू माफियांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. घटनास्थळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बबलू गुणाजी वक्ते , गणेश बाबुराव इनकर , आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार बालकांचा खड्ड्यातील पाण्यात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला हे सिंदफना काठावरील गाव आहे. या ठिकानाहून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आह. नदीपात्रात केलेल्या खड्यात पाणी साचलेले आहे. या पाण्यात बुडून या चार बालकांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेवराई तालुक्यातील बहुतांश भागात सर्रास वाळू उपसा सुरू आहे अन तो ही महसूल अन पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने कोणत्याच वाळू माफियावर कारवाई होत नाही. दोन दिवसांपूर्वी राक्षसभुवन येथे केणीचा दांडा लागून एका मजुराचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा चार बालकांच्या मृत्युची ही घटना घडली आहे. याअगोदर देखील या वाळू उपशाने अनेकांचे जीव घेतले आहेत.
शहाजानपूर चकला याठिकाणी आज बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाची चार मुले नदीकाठी पोहत होती. दरम्यान वाळू उपशाने खड्डा झालेल्या ठिकाणी हि मुले बुडाली. यामध्ये चार हि जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी जमाव आक्रमक झाला असून हप्तेखोर प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.